समृद्ध कलापरंपरा जोपासण्यासाठी सज्ज व्हा ---धर्मराज काडादी
युवा महोत्सवातील संगमेश्वरच्या कलाकारांचा गौरव सोलापूर
सोलापूर प्रतिनिधी - ''आपल्या कॉलेजची कलाक्षेत्रातली परंपरा समृद्ध आहे. या युवा महोत्सवातून कित्येक कलाकार घडले. वैविध्यपूर्ण कलांना प्रोत्साहन देण्यासाठी संगमेश्वर कॉलेजचे व्यवस्थापन कटिबद्ध आहे. येणाऱ्या काळात उत्तम सभागृहांची व्यवस्था होणार आहे. सुसज्ज भौतिक सुविधा आपल्या विद्यार्थ्यांना आपण सादरीकरणासाठी कक्ष उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे संगमेश्वरची विद्यापीठांमधील समृद्ध कला परंपरा जोपासण्यासाठी सज्ज व्हा." असे आवाहन संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले. ते नुकत्याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विसाव्या युवा महोत्सवात उपविजेता संघातील विद्यार्थ्यांच्या गौरव कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. दादासाहेब खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी युवा महोत्सवातील क्रमबद्ध कार्यक्रमाची माहिती सांस्कृतिक विभाग प्रमुख दादासाहेब खांडेकर यांनी करून दिली. त्यानंतर धर्मराज काडादी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्र.प्राचार्यांनी सांस्कृतिक विभागाचा ऐतिहासिक वारसा सांगत, मनोगत व्यक्त केले. या गौरव कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा.डॉ. सुहास पुजारी ,डॉ. वंदना पुरोहित, डॉ. सरवदे,डॉ.राजकुमार मोहोरकर यांच्यासह युवा महोत्सवातील कलाकार विद्यार्थी, सर्व विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .याच कार्यक्रमात या संपूर्ण युवा महोत्सवात सहभागी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे विविध क्षेत्रातील त्यांचे गुरु माजी विद्यार्थी यांचा कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला.
निकाल याप्रमाणे---20 वा युवा महोत्सव उन्मेष सृजन रंगाचा १) मेहंदी - तृतीय २) निर्मिती चित्र - द्वितीय ३) काव्यवाचन - प्रथम ४) शास्त्रीय गायन - तृतीय ५) भारतीय समूह गीत - द्वितीय ६) पाश्चात्य समूह गीत - द्वितीय ७)पाश्च्यात्य सोलो - द्वितीय ८) पथनाट्य - तृतीय ९) मुकनाट्य - तृतीय १०) प्रहसन - प्रथम ११) नकला - प्रथम १२) एकांकिका - प्रथम १३) लोकनृत्य - द्वितीय १४) शास्त्रीय नृत्य - प्रथम १५) शोभा यात्रा - द्वितीय १६) उत्कृष्ट अभिनय पुरुष प्रथम- जैद् शेख १७) उत्कृष्ट अभिनय स्त्री प्रथम - सई दरेकर १८) उत्कृष्ट संघ व्यवस्थापक - द्वितीय श्रीमती सुनीता सरवदे डॉ.दादासाहेब खांडेकर ,गोल्डन बॉय - जैद अब्दुल हसन शेख फिरते चषक सर्वसाधारण_उपविजेता (द्वितीय) १) नाट्य विभाग विजेता ट्रॉफी २) नृत्य विभाग विजेता ट्रॉफी , एकूण बक्षिसे १८. बळवंत जोशी यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा