यशस्वी उद्योजक उत्तम कौशल्य मिळवत राहतो. पुष्पराज कोठारी


बिजनेस क्विझमध्ये एच.एन.कॉलेजचे ईशान,आयुष्य विजेते 

सोलापूर दिनांक 22 

 ''यशस्वी उद्योजक होण्यासाठी कौशल्य महत्त्वाचे आहे त्यासाठी कठोर मेहनत आणि सातत्यपूर्ण  अभ्यासाची गरज आहे. स्पर्धेच्या युगामध्ये उत्तम कौशल्य असणे खूप गरजेचे आहे.  व्यवस्थापनातील उत्तम कौशल्यातूनच उद्योग भरभराटीस येतो म्हणून  उद्योग वाढीसाठी उत्तम कौशल्य,कठोर मेहनत,आव्हानांना सामोरे जाणे करणे गरजेचे आहे'' असे मत कोठारी ग्रुपचे संचालक पुष्पराज कोठारी यांनी व्यक्त केले . संगमेश्वर कॉलेजच्या वतीने आयोजित केलेल्या  बिजनेस क्वीज २०२४ च्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी  अध्यक्षस्थानी  कॉलेजचे प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा  उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, वाणिज्य समन्वयक बी. आय. हणमगाव  आदी उपस्थित होते.

 कॉमर्सच्या बिजनेस स्क्वीजमध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या कॉलेजमधून 300 विद्यार्थी उपस्थित होते.

निकाल -  प्रथम क्रमांक-  ईशान शहा. आयुष संख (एच.एस.सी. कॉलेज)  द्वितीय क्रमांक - राज मुंदडा ,शुभांगी जैन ( एच.एस.सी. कॉलेज) , तृतीय क्रमांक -  ऋग्वेद देशमुख, सृष्टी इनामदार (संगमेश्वर कॉलेज ) उत्तेजनार्थ प्रथम -  योगेश्वरी यादव, मनीषा शिंदे ( छत्रपती शिवाजी डे ज्युनिअर कॉलेज ) उत्तेजनार्थ द्वितीय-  सोमय्या सुरपूरकर, रिया धुळराव



अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी वाणिज्य शाखेतील  व्यावसायिक प्रश्नमंजुषा स्पर्धेचे महत्व पटवून दिले. यातून  नक्कीच  वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील उद्योगासाठी याचा फायदा होईल. असा विश्वास व्यक्त केला.  या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.गणेश मुडेगावकर, शिवराज देसाई यांनी काम पाहिले.  प्रास्ताविक पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय तेजश्री तळे यांनी करून दिला.सूत्रसंचालन संगीता म्हमाणे यांनी केले तर आभार  समन्वयक बी. आय. हणमगाव यांनी मांडले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी बीबीए विभागाच्या शितल माशाळे,  लक्ष्मी कलशेट्टी, अनिश नाईक, समृद्धी लांडगे,  गौरी कलशेट्टी, तन्वी देवकर, रोहित पाखरे यांनी जबाबरी पार पाडली. यावेळी अनिता अलकुंटे,सायबण्णा निम्बर्गी,बाबासाहेब सगर,रूपाली पाटील,संतोष पवार,राज मळेवाडी,गौरव जुगदार, निखिल काळे, निनाद सपकाळ, रवींद्र बिराजदार, मल्लिकार्जून पाटील, संतोष फुलारी यांनी परिश्रम घेतले.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा