कर्मयोगीअप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय निसर्ग चित्र स्पर्धा


सोलापूर शहरातील वैविध्यपूर्ण ठिकाण रेखाटले राज्यभरातून आलेल्या चित्रकारांनी

सोलापूर दिनांक ९ फेब्रुवारी - कर्मयोगीअप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाच्या वतीने राज्यस्तरीय भव्य निसर्ग चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कला महाविद्यालयाचे यंदाचे रौप्य   महोत्सव असल्याने महाराष्ट्रातील कलावंतांसाठी खुल्या निसर्ग चित्रण स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोलापूर शहरातील प्रेक्षणीय स्थळांचे चित्रण करून या स्पर्धेमध्ये आपली कला सादर केली. महाराष्ट्रातून आलेल्या सर्व चित्रकारांनी सकाळी ७ ते ८ या वेळेत आपली नावे नोंदवली.त्यानंतर सोलापुरातील कोणत्याही परिसरातील एका ठिकाणाचे चित्रण करावयाचे होते. ज्या त्या ठिकाणासाठी ते रवाना झाले. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत त्यांनी चित्र आणून दिली. त्यानंतर परीक्षकांनी त्या चित्रांचे परीक्षण केलं. 


 

                                                       प्रारंभी प्राचार्य सचिन गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.कला महाविद्यालयाच्या स्थापनेपासून सोबत असलेले निवृत्त कलाशिक्षक, चित्रकार मल्लिनाथ बिलगुंदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. २५ वर्षांचा काळ त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांसमोर ठेवला. त्यानंतर अध्यक्ष स्थानावरून बोलताना धर्मराज काडादी यांनी कला महाविद्यालय काढण्या मागचा हेतू, तत्कालीन परिस्थितीत सोलापूरची कला जोपासली जावी यासाठी केलेले प्रयत्न या बाबी सांगत आपले मनोगत व्यक्त केले.उपस्थित विजेत्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 


स्पर्धेत भव्य पन्नास हजार रुपयाची एकत्रित प्रत्येकी पाच हजार रूपयांची दहा पारितोषिके देण्यात आली. निकाल -  मेघराज फरकाळे( अभिनव कला महाविद्यालय, पुणे ) संदीप कुंभार (इचलकरंजी )कार्तिक कुंभार (जे.जे .स्कूल ऑफ आर्ट, मुंबई ) सुरज कारंडे (जे.जे .स्कूल ऑफ आर्ट, मुंबई )  दत्तात्रय मागाडे ( सांगली)  निलेश उदमले (जे.जे .स्कूल ऑफ आर्ट, मुंबई )  सुरज निकते ( रत्नागिरी ) विशाल सुतार जे(जे.जे .स्कूल ऑफ आर्ट, मुंबई )  प्रज्ञान पांडे (जे.जे .स्कूल ऑफ आर्ट, मुंबई )  प्रणय फराटे ( रत्नागिरी ) परीक्षक म्हणून निवृत्त प्राचार्य गोपाळ डोंगे, निवृत्त कलाशिक्षक रामचंद्र हाके, विठ्ठल मोरे यांनी परीक्षण केलं.


या टॉप टेन बक्षिसासाठी प्रायोजकत्व  शिल्पकार भगवान रामपुरे, दत्ताअण्णा सुरवसे,  नेत्र विशार डॉ.उमा प्रधान, आर्किटेक वैभव इंगळे, लोकसेवा हायस्कूलचे संस्थापक सुनील धोत्रे, मॉडर्न स्टेशनरीचे मयूर बाकळे, निवृत्त कलाशिक्षक रामचंद्र हाके, कलाशिक्षक-चित्रकार  नितीन खिलारे,  लोधेश्वर पेंटिंगचे देविदास बडूरवाले, लोटस एजन्सीचे प्रसाद चोळचगुड्ड, मीनाक्षी ज्वेलर्स गोपी मीठा, रिफ्रेश एअर फ्रेशनरचे विशाल सुर्डी, सुमित्रा नागरतन इचगे यांनी स्वीकारलं होतं. संध्याकाळी ६ वाजता संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, निवृत्त कलाशिक्षक मल्लिनाथ बिलगुंदी यांच्या प्रमुख उपस्थिती चित्रकला महाविद्यालयाच्या आवारात बक्षीस वितरण झाले. या स्पर्धेत सोलापूरसह महाराष्ट्रातील विद्यार्थी हौशी चित्रकार, नामवंत कला महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा.मिनाक्षी रामपुरे, प्रा. देवेंद्र निंबर्गीकर, प्रा. मल्लिकार्जुन सालीमठ, प्रा. आशिष माशाळे, लिपिक श्रीपती गोटे, शिक्षकेतर कर्मचारी मठपती आदी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन मनाली जाधव हिने केले तर आभार देवेंद्र निम्बर्गीकर यांनी मांडले.


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के