जीआयएसमध्ये अनेकविध करिअरच्या संधी --डॉ. चेतन हुलसुरे
संगमेश्वर कॉलेजमध्ये भूगोल विभागात GIS वर व्याख्यान
सोलापूर प्रतिनिधी –
'' GIS हे तांत्रिक कौशल्य आणि डेटा विश्लेषण यांचा संगम असलेले क्षेत्र आहे. भविष्यातील स्मार्ट योजना, आपत्ती व्यवस्थापन, जलसंपत्ती नियोजन यामध्ये GIS चा वापर वाढतच जाईल, त्यामुळे हे क्षेत्र करिअरसाठी अत्यंत भविष्यदर्शी आहे.जीआयएस भविष्यातील करिअरसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि व्यापक संधी असलेले क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांनी यामध्ये कौशल्य विकसित केल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.'' असे प्रतिपादन डॉ. चेतन हुलसुरे यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेजच्या भूगोल विभागाच्या वतीने ‘ जीआयएसमधील करिअरच्या संधी ’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते.यावेळी उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी, भूगोल विभागप्रमुख डॉ. राजकुमार मोहरकर आदी मंचावर उपस्थित होते.
याच कार्यक्रमात कुमार स्वामी कॉलेज, औसा येथील भूगोल विभागप्रमुख डॉ. संजीवकुमार आस्टुरे यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. पर्यावरणाचे महत्त्व, नकाशा शास्त्राचा अभ्यास, तसेच भूगोल विषयातून उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधी यावर प्रकाश टाकला. ते पुढे म्हणाले की, “भूगोल हा केवळ एक शालेय विषय न राहता तो आजच्या युगात शाश्वत विकासासाठी मूलभूत आधार ठरत आहे. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी जागरूक नागरिक आणि नवनवीन तंत्रज्ञान हाताळणारे भूगोलत
ज्ञ आवश्यक आहेत."
डॉ. चेतन हुलसुरे यांनी आपल्या व्याख्यानात जीआयएसचा उपयोग नागरी नियोजन, शेती विकास, पर्यावरण व्यवस्थापन, आपत्ती निवारण, पायाभूत सुविधा विकास आदी क्षेत्रांमध्ये कसा होतो, याचे प्रात्यक्षिकांसह विवेचन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी जीआयएस आणि डिजिटल नकाशावाचन यांसारख्या नव्या तंत्रज्ञानांच्या उपयोगाने शैक्षणिक क्षेत्रात होत असलेल्या सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाची प्रस्तावना भूगोल विभागप्रमुख डॉ. राजकुमार मोहरकर यांनी केली. तर प्रमुख पाहुण्याचा परिचय कु. यांनी केला.
या कार्यक्रमाला भूगोल विभागातील डॉ. शिवाजी मस्के, डॉ.मंजू संगेपाग,प्रा. संतोष पवार, प्रा.शिरीष जाधव, डॉ, वैभव इंगळे, डॉ. प्रकाश कादे, डॉ. राहुल साळुंखे, प्रा. रिद्धी बुवा आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन यांनी केले . यांनी सर्वांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा