विद्यार्थ्यांनी जाणून घेतली ग्रंथालय कामकाजाची माहिती

  

ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जन्मदिनी संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालय कामकाजाची माहिती करून घेतली. तत्पूर्वी प्रा. डॉ. सुहास पुजारी यांच्या उपस्थितीत ग्रंथालय शास्त्राचेजनक डॉ.एस .आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

       या कार्यक्रमानंतर ग्रंथालय भेटीचे नियोजन मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता अकरावी बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी ग्रंथालयातील  वेगवेगळ्या विभागांची माहिती करून घेतली. याप्रसंगी सहाय्यक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी यांनी संपूर्ण ग्रंथालयाचे माहिती सविस्तर दिली. या उपक्रमात अशोक निम्बर्गी, सायबण्णा निम्बर्गी, दत्तात्रय गुड्डेवाडी, संतोष पवार उपस्थित होते.












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के