संगमेश्वर कॉलेजच्या बी.कॉम. 1978 सालच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात

 

सोलापूर दिनांक -२७ डिसेंबर २०२५ 



बी.कॉम. 1978 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा संगमेश्वर कॉलेजच्या आवारात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी केशरी अबोली रंगाच्या टी-शर्ट मधील सर्व मान्यवर मंडळी कॉलेजमध्ये आली. त्यांनी कॉलेजचा परिसर बारकाईने पाहून घेतला. प्रत्येकाच्या आठवणींना इथे उजाळा मिळला. त्यानंतर ग्रंथालय, मैदान, क्रीडा विभाग, जिमखाना, नव्याने सुरू झालेले youtube चॅनेलचे हॉल अर्थात कॉलेज मीडिया सेंटर, नवीन इमारती, संगणक कक्ष या सर्व बाबी बारकाईने पाहिल्या. त्यानंतर आरजे श्रद्धा हिने या ज्येष्ठांच्या अनुभवावर मुलाखती घेतल्या. संगमेश्वर हे क्रीडा परंपरेतील अव्वल असलेलले  एकमेव कॉलेज, शिवाजी विद्यापीठापासून असल्याचं आवर्जून क्रीडापटू सांगत होते. त्यांच्यासोबत इथल्या गॅदरिंग मधले काही मजेदार किस्सेही यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले. सोबतच के. भोगीशयना यांचा दरारा, गुणवत्तेच्या बाबतीत असलेलं त्यांचं धोरण.एक माणूस म्हणून लोण्याहूनही मऊ असलेला मायेचा माणूस कसा होता? अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

 या विद्यार्थ्यांसोबत एक वर्ष काही वर्षे ज्युनिअर असलेले संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन धर्मराज काडादी यांनी देखील आपल्या आठवणींना उजाळा देत सर्वांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले. त्यानंतर फोटोसेशनचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी बी 1 च्या वर्गात आपली मनोगते सादर केली. सरते शेवटी कॉलेजच्या वतीने प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा आणि उपप्राचार्य प्रा.डॉ.सुहास पुजारी यांनी उपस्थितांना त्यांच्या काळातील अर्थात 1978 सालातील त्यांनी भरलेल्या कॉलेज ऍडमिशन फॉर्मच्या झेरॉक्स प्रति दिल्या. ही सारी संकल्पना डॉ. राजेशेखर येळीकर सरांनी घडवून आणली. हा कृतज्ञ भाव प्रत्येकाने व्यक्त केला. बोटॅनिकल गार्डन मध्ये या विद्यार्थ्यांच्या बॅचची आठवण म्हणून दोन वृक्ष लावण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक पी. आर. हिरेमठ सर यावेळी उपस्थित होते. याच कार्यक्रम प्रसंगी सौ मंजिरी कानेगावकर- पानसे यांनी हिरव्या चाफ्याची आठवण सांगितली आणि मस्तपैकी कविता सादर केली.शेवटी लक्ष्मी ऑटोमोबाईलचे दीपक पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.














































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी