भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन संगमेश्वरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा
भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन संगमेश्वरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा
सोलापूर प्रतिनिधी
भारतीय भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन संगमेश्वरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा साजरा झाला. सर्वप्रथम ९ महाराष्ट्र एनसीसी बटालियन च्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर प्राचार्य राजेंद्र देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपस्थितांना प्राचार्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर वर्षभरात विशेष प्राविण्य मिळवलेल्या प्रा.
आप्पासाहेब ढोणे,डॉ. सुहास गाडे ,राहुल कऱ्हाडे,प्रा.सौ .डॉ. बगले या
मान्यवर शिक्षक,कर्मचारी यांचा प्राचार्यांच्या
हस्ते गौरव करण्यात आला .
याप्रसंगी उपप्राचार्य वंदना पुरोहित, डी.एम. मेत्री, रात्र महाविद्यालयाचे
प्राचार्य श्रीनिवास गोठे, कनिष्ठ महाविद्यालयाचे
उपप्रचार्य प्रसाद कुंटे, एनसीसी कॅडेट, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.मेजर चंद्रकांत हिरतोट
आणि डॉ.राजकुमार मोहरकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संगमेश्वरच्या क्रीडांगणावर
भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने टेनिस बॉल क्रिकेट
स्पर्धेचे आयोजन संगमेश्वरच्या क्रीडांगणावर
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने टेनिस बॉल क्रिकेट
स्पर्धेचे आयोजन संगमेश्वरच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले होते. याचे
उद्घाटन संस्थेचे सचिव धर्मराज काडादी यांच्या हस्ते झाले. संगमेश्वर शिक्षण
संकुलाचे प्राध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर
कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी यशस्वीतेसाठी सर्व विभाग प्रमुख, तसेच जिमखाना विभाग प्रमुख आनंद चव्हाण, विक्रांत विभुते, यांनी परिश्रम घेतले. यामध्ये ज्युनिअर सायन्स, ज्युनिअर आर्ट्स,ज्युनिअर कॉमर्स, शिक्षकेतर कर्मचारी संघ आणि व्यवस्थापन व संगणक शास्त्र संघ या संघात नॉक आऊट अर्थात बाद पद्धतीने सामने खेळले गेले. व्यवस्थापन व संगणक शास्त्र संघ विरुद्ध ज्युनिअर आर्ट्स यांच्यात चुरशीचा अंतिम सामना झाला .
यात व्यवस्थापन व संगणक शास्त्र संघ विजयी झाला.सामन्याचे धावते वर्णन मराठी विभागप्रमुख सुहास पुजारी, संतोष पवार, हिंदीमधून शरण वांगी ,संतोष खेंडे, राजेंद्रकुमार तोळणुर यांनी केले. विजेत्या संघाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात फिरता चषक देऊन गौरव करण्यात येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा