संगमेश्वरच्या क्रीडांगणावर भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

 भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन संगमेश्वरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा

संगमेश्वरच्या क्रीडांगणावर भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 















































सोलापूर प्रतिनिधी 

भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संगमेश्वरच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन संस्थेचे सचिव धर्मराज काडादी यांच्या हस्ते झाले. प्रारंभी सर्व संघांची ओळख सचिवांनी करून घेतली. त्यानंतर नाणेफेकी झाली.सुरुवातीच्या संघामध्ये सामना सुरू झाला . यावेळी संगमेश्वर शिक्षण संकुलाचे प्राध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



                              स्पर्धा यशस्वी यशस्वीतेसाठी सर्व विभाग प्रमुख, तसेच जिमखाना विभाग प्रमुख आनंद चव्हाण, विक्रांत विभुते, यांनी परिश्रम घेतले. यामध्ये ज्युनिअर सायन्स, ज्युनिअर आर्ट्स,ज्युनिअर कॉमर्स, शिक्षकेतर कर्मचारी संघ आणि व्यवस्थापन व संगणक शास्त्र संघ या संघात बाद पद्धतीचे नॉक आऊट अर्थात बाद पद्धतीने सामने खेळले गेले. व्यवस्थापन व संगणक शास्त्र संघ विरुद्ध ज्युनिअर आर्ट्स यांच्यात चुरशीचा अंतिम सामना झाला .यात व्यवस्थापन व संगणक शास्त्र संघ विजयी झाला.सामन्याचे धावते वर्णन मराठी विभागप्रमुख सुहास पुजारी, संतोष पवार, हिंदीमधून शरण वांगी ,संतोष खेंडे, राजेंद्रकुमार तोळणुर यांनी केले.  विजेत्या संघाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात फिरता चषक देऊन गौरव करण्यात येणार आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा