अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थीदशेत निवेदन कलेतून भाषिक जाणीव निर्माण होते ---- प्रा.डॉ. सुहास पुजारी

 

ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी निवेदनकला तंत्र व सादरीकरण प्रमाणपत्र अभ्यासक्रम

सोलापूर  ( दिनांक १३ )  '' विद्यार्थ्यांनो  कोणत्याही शाखेत करिअर करा मात्र उत्तम बोलता आले तरच तुमचे परिपूर्ण व्यक्तिमत्व घडते. निवेदन व सादरीकरण  ही कला अवगत होण्यासाठी पाठांतराचे मूल्य नाकारता येत नाही. उत्तम सकस वाचनही महत्वाचे आहे. थोरा मोठ्यांचे विचार, सुभाषिते, सुविचार, सुवचने यातून तसेच संत वचनातूनही उत्तम विचारांचे सादरीकरण आपण करू शकतो. आवाजाच्या दुनियेतील उत्तम कलाकारांचे निरीक्षण करा.'' असा सल्ला मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सुहास पुजारी यांनी दिला. ते संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) विभाग कनिष्ठ विभागाच्या निवेदनकला  तंत्र आणि सादरीकरण या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी मंचावर पर्यवेक्षक मल्लीनाथ साखरे, अभ्यासक्रम समन्वयक प्रा.अशोक निम्बर्गी  उपस्थित होते.

संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) विभाग कनिष्ठ विभागाच्या निवेदनकला  तंत्र आणि सादरीकरण या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.सुहास पुजारी 


प्रारंभी प्रा. अशोक निंबर्गी यांनी प्रास्ताविक केले. त्यात भाषिक कौशल्याचे महत्त्व सांगून सर्वांगिण व्यक्तिमत्त्वासाठी बोलणे ही कला कशी महत्त्वाची आहे, याचे महत्त्व सांगितले.त्यानंतर डॉ.सुहास पुजारी यांचा सत्कार झाला.  


सत्कारानंतर प्रा. संतोष पवार यांनी अभ्यासक्रमाचा आराखडा स्पष्ट केला.



 त्यानंतर डॉ. पुजारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.आपल्या अध्यक्षीय मनोगतात पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांनी विद्यार्थ्यांनी मिळालेल्या या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.


सूत्रसंचालन दत्तात्रय गुड्डेवाडी यांनी केले तर आभार साहेबण्णा निम्बर्गी यांनी मानले. 



 कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा