बारावीत संगमेश्वर कॉलेजचा निकाल ९१.९७ टक्के

 

बारावीत संगमेश्वर कॉलेजचा निकाल  ९१.९७ टक्के





सोलापूर दिनांक ( २५ मे  २०२३ ) येथील संगमेश्वर ज्युनिअर कॉलेज ,सोलापूरचा बारावीचा निकाल  ९१ .९७   टक्के इतका लागला. शाखा निहाय निकालाची टक्केवारी पुढीप्रमाणे  - विज्ञान शाखा - ९८.४२ , वाणिज्य शाखा - ९४.२० , कला शाखा -  ७७.९७ टक्के इतका लागला . विज्ञान व कला शाखेत मुलींनी बाजी मारली.तर वाणिज्य शाखेचा राघव विशाल बन्सल (प्रथम ९३.३३) हा विद्यार्थी कॉलेजमधून तिन्ही शाखांमधून प्रथम आला.

यशस्वी विद्यार्थी-  विज्ञान शाखेतून - नंदिनी नागेश सुत्रावे ( प्रथम  ८९.००) सलोनी पुषपराजसिंह बायस ( द्वितीय ८७.००) सुहानी ऋषिकेश शाह  (तृतीय ८६.५०) तर वाणिज्य शाखेतून - राघव विशाल बन्सल (प्रथम ९३.३३) वरद विजय जोशी  (द्वितीय ९३.००)समर्थ प्रसन्न स्वामी ( तृतीय ९२.१७) कला शाखेतून  - प्रीती महादेव कोरी ( प्रथम ८९.६७  ) रोहित नारायणारं सुतार ( द्वितीय ८९.५०  ) साक्षी चंद्रकांत करपे ( तृतीय ८८.१७)












            या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय कॉलेज आणि आपल्या शिक्षकांना दिले. यशस्वी विद्यार्थ्यांचे  संगमेश्वर एज्युकेशन  सोसायटीचे सचिव मा. धर्मराज काडादी,संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन समिती सदस्य  पुष्पराज काडादी , प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई  ,उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, भाषा समन्वय प्रा. शिवराज पाटील , विज्ञान शाखा समन्वक प्रा. रामराव राठोड , वाणिज्य समन्वयक प्रा. बसय्या हणमगाव यांच्यासह सर्व विभागातील प्राध्यापकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा