एमएचटी-सीईटी परीक्षेत संगमेश्वर कॉलेजमधून संचिता वठारे, नंदिनी सुत्रावे अव्वल स्थानावर

  एमएचटी-सीईटी परीक्षेत संगमेश्वर कॉलेजमधून

संचिता वठारे, नंदिनी सुत्रावे अव्वल स्थानावर 

सोलापूर ( प्रतिनिधी )

   महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलकडून एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल काल १२ जूनला जाहीर करण्यात आला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) ग्रुप्ससाठी महाराष्ट्र कॉमन एंट्रेन्स टेस्ट २०२३ चा निकाल घोषीत करण्यात आला. यामध्ये  संगमेश्वर कॉलेजमधून संचिता चंद्रशेखर वठारे ( ९८.०० पर्सेन्टाइल ),नंदिनी नागेश  सुत्रावे ( ९९.६०  पर्सेन्टाइल ) अव्वल स्थानावर राहिले.



पर्सेन्टाइलनुसार निकाल - ( PCB ) शकुंतला संतोष कलशेट्टी ९५.६, ओमकार महादेव शिवशेट्टी ९५,मोहम्मद कैफ इब्राहिम बिराजदार ९०.८७,ऐश्वर्या सिद्धाराम बिराजदार ८९ .८१,गणेश शशिकांत सकट ८८.६,शगुन संजय राठोड ८८.१७,निकिता गुरुशांत हावशट्टी ८७.४५,वैष्णवी अजित जाधव ८६.११,प्रिया विनायक परदेशी ८५.५३, विश्वजीत अतुल कोथिंबीर ८५.३८.

पर्सेन्टाइलनुसार (PCM) - देवांग नितीन देशपांडे ९८.६९, विद्याराणी पृथ्वीराज देशमुख ९८.५,सलोनी पुष्पराज सिंग बायस ९८.२१,ऋतुजा राजू शेटे ९७.६१,आदित्य आनंद कस्तुरे ९७.५१ ,अक्षय बाबू महाजन ९७.४९,सुहानी ऋषिकेश शहा ९६.९८,स्वस्तिक महादेव काबरा ९५.८५, रितिका रेवणसिद्ध चौगुले ९५.७७,जगदीश कडगंजी महाराज ९५.७७,मोहम्मद आझम मुजम्मिल अहमद शेख ९५.६२, गुरुप्रसाद सिद्धाराम हन्नुरे ९५.५०, ऋतिक काशिनाथ दसाडे ९५.१२,अथर्व सिद्धेश्वर तावरे ९४.४,अमित गणेश माढेकर ९१.७७,रुद्रसिंग राहुल इंगळे ९०.१८, विराज उदयकुमार पाटील ८९.२९, निखिल सिद्राम सबबन ८८.००,वरद गोविंद आदोने ८७.६९,अंजली अनिल व्हदलूरे ८७.२५,बुधभूषण महेंद्र गायकवाड ८७.२१,सात्विक राजशेखर हरकरे ८६.१६,समृद्धी तागडे ९६.७७.

            या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय कॉलेज आणि आपल्या शिक्षकांना दिले. 

याच कार्यक्रमात  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी ) या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षेत देशातून २२ वी ( ओबीसी प्रवर्ग )आलेल्या आलेली विद्यार्थ्यांनी श्रीस्मृती बुरकुल हिचा देखील यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  NIFT ने जागतिक दर्जाचे शिक्षण, उत्कृष्ट प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधीसह विद्यार्थ्यांना फॅशन तंत्रज्ञानातील शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण उपलब्ध  करून दिले आहे. NIFT मध्ये शिकलेला  विद्यार्थी त्यांच्या सर्जनशील रचना आणि अतुलनीय व्यवस्थापन कार्यशैलीसह जागतिक स्तरावर भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थेसाठी नाव कमवत आहे.



                       याप्रसंगी बोलताना व्यवस्थापन समिती सदस्य व सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुष्पराज काडादी म्हणाले की , " यशाला परिस्थिती कारणीभूत नसते, प्रामाणिक सातत्यपूर्ण कष्ट केल्यास यश नक्की मिळते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश नक्कीच कौतुकास्पद आहे."

यशस्वी विद्यार्थ्यांचे संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन समिती सदस्य  पुष्पराज काडादी , प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई  ,उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, विज्ञान शाखा समन्वक प्रा. रामराव राठोड , यांच्यासह सर्व विभागातील प्राध्यापकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. यादीवाचन लीना खमीतकर, सिद्धाराम विजापूरे यांनी केलं. सूत्रसंचालन डॉ. गणेश मुडेगावकर यांनी तर रामराव राठोड यांनी सर्वांचे आभार मानले.


फोटो -  एमएचटी- सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सोबत संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन समिती सदस्य  पुष्पराज काडादी,प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई,उपप्राचार्य प्रसाद कुंटे आणि शिक्षक वृंद.







टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा