संगमेश्वरमध्ये हँड्स ऑन रोबोटिक्सची कार्यशाळा

 

संगमेश्वरमध्ये हँड्स ऑन रोबोटिक्सची कार्यशाळा

सोलापूर प्रतिनिधी-

आत्मनिर्भर भारत होण्यासाठी मिळालेले नॉलेज वाढवा. जो अभ्यास कराल, संशोधन कराल त्याचे पेटंट मिळवायचा प्रयत्न करा आणि महाविद्यालयाचे नाव लौकिक वाढवा." असे प्रतिपादन संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांनी केले.संगमेश्वर कॉलेजमधील व्होकेशनल इलेक्ट्रॉनिक्स विभाग व फिजिक्स (ज्यु.) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "हँड्स ऑन रोबोटिक्स" या विषयावरील कार्यशाळेच्या  उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे पर्यवेक्षक मल्लिनाथ  साखरे, भौतिक शाश्त्र विभागप्रमुख डॉ.शुभांगी  गावंडे,तज्ञ मार्गदर्शक डॉ. बचुवार,डॉ.जोगदे उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा. शुभदा  कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले .सूत्रसंचालन प्रा. प्रियंका पाटील यांनी केले. तर आभार प्रा.चंद्रकांत हिरतोट यांनी मानले.या प्रसंगी प्रा.प्रशांत शिंपी,प्रा.बाळकृष्ण कापसेप्रा.डॉ.गणेश मुडेगावकरप्रा.नागेश कोल्हे प्रा. शंकर शितलप्रा.श्रुती तुळशेट्टी,प्रा.मानसी काळे यांच्यासह बारावी इलेक्ट्रॉनिकचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




या  कार्यशाळेला साहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक एस. एस. नडीमेटला  यांनी भेट दिली त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा प्रकारच्या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्ह स्किल्सचा नक्कीच विकास होतो. असे त्यांनी प्रतिपादन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा