संपन्न आरोग्यासाठी प्राचीन आयुर्वेदातील ज्ञान जाणून घ्या - डॉ. संभाजी पाटील


विज्ञान आणि आयुर्वेद या विषयावर संगमेश्वरमध्ये व्याख्यान

सोलापूर ( दिनांक ११ )

''  बदलत्या जीवनशैलीमुळे मानवाला आरोग्य कडे लक्ष द्यायला वेळ नाही अशी गतिमान परिस्थिती  निर्माण झाली आहे त्यामुळे जीवन व्याधीग्रस्त बनत चालले आहे संपन्न आरोग्यासाठी प्राचीन आयुर्वेदातील ज्ञान जाणून घ्या आणि त्याचा वापर करा वैज्ञानिक दृष्टीने  आयुर्वेदातील बारकावे जाणून घेतले तर जीवन संपन्न होईल'', असे मत डॉ. संभाजी पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी  उपप्राचार्य प्रसाद कुंटे, विज्ञान विभाग प्रमुख रामराव राठोड उपस्थित होते. 


                     प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर कॉलेजच्या वतीने वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.   त्यानंतर त्यानी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला ते पुढे म्हणाले की, ''  योग आणि आयुर्वेद यांचा अनन्यसाधारण संबंध आहे.  काळ काम आणि वेगाबरोबर आपण काम करत राहिलो तर निश्चितच आपण इच्छित ध्येय  गाठू शकतो.  त्यासाठी कठोर मेहनत  सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज आहे.  दैनंदिन सूर्यनमस्काराने  तान तणावाचे व्यवस्थापन आपोआपच होते  त्याचा अंगीकार महत्त्वाचा आहे.






याप्रसंगी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, शिक्षक विज्ञान मंडळाचे समन्वयक सुभाष पाटील, लीना खमितकर, प्रियांका पाटील , तुळशेट्टी, शंकर शितल,उपस्थित होते. रूपाली अंबुलगे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रशांत शिंपी यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा