कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या 114 व्या जयंती निमित्त अभिनव उपक्रम सप्ताह

पुष्प 4 थे - संगमेश्वर महाविद्यालयास शैक्षणिक सदिच्छा भेट

कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या 114 व्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या अभिनव उपक्रम सप्ताह अंतर्गत आज बुधवार दि. 13.09.2023 रोजी श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर प्रशालेतील इ. 10 वीच्या अ, ब, क या तुकडीतील विद्यार्थ्यांनी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी उभ्या केलेल्या अनेक शैक्षणिक संस्थांपैकी नावाजलेली व प्रसिद्ध संस्था म्हणजे संगमेश्वर महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी कॉलेजचे प्राचार्य मा. डॉ.राजेंद्र देसाई व उपप्राचार्य  मा. श्री प्रसाद कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक डॉ.गणेश मुडेगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करीत महाविद्यालयीन जीवनाची जबाबदारी समजावून दिली. तदनंतर विद्यार्थ्यांनी विविध विभागांना भेटी दिल्या. 


यामध्ये संगणक विभागाच्या सौ.स्नेहल खैरे यांनी अत्याधुनिक संगणक कक्ष दाखवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली.*भौतिकशास्त्र विभागाचे श्री.चंद्रकांत हिरतोट*, प्रा. अभिजित निवर्गिकर, प्रा. प्रियांका पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणाची माहिती दिली. रसायनशास्त्र विभागाचे श्री.बी.एम.कापसे, प्रा. आहेरकर, प्रा. पाटील, प्रा. विशाल जत्ती यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे विविध रसायनांची माहिती दिली. जीवशास्त्र विभागाचे श्री.रामराव राठोड यांनी विद्यार्थ्यांना विविध जीवाश्म अवशेषांची ओळख करून दिली. यानंतर महाविद्यालयाचा भव्य-दिव्य ग्रंथालय जिथे एक लाखाहून ही अधिक पुस्तके उपलब्ध आहेत अशा विभागाची माहिती डॉ.मुलीमनी आणि श्री. संतोष कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.

 त्याचबरोबर प्रशालेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत प्रशालेस  कॉलेजचा प्रसिद्ध 'प्रज्ञा' हा वार्षिकांक भेट दिला. याचबरोबर जेईई, नीट, सिईटी सेल समन्वयक डॉ.गणेश मुडेगावकर, इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या सौ.शुभदा कुलकर्णी आणि क्रीडा विभागाचे श्री संतोष केंडे यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या विभागाची माहिती दिली. 


उल्लेखनीय बाब म्हणजे भारताच्या प्रसिद्ध NIT  कॉलेजमधील रँक होल्डर डॉ. अजित राय यांनी मुलांना विविध स्पर्धा परीक्षांची माहिती सांगत पुढील शैक्षणिक वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

▪️ अशाप्रकारे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.संतोष पाटील,उपमुख्याध्यापक श्री.राजकुमार उंबरजे व पर्यवेक्षक श्री.विनोद बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या सदिच्छा भेटीस इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री.शिवानंद हिरेमठ, श्री.रविंद्र कबाडे व श्री.योगिनाथ वाघोले त्याचबरोबर श्री.निलेश दंतकाळे तसेच इ.10वीचे विद्यार्थी आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडल्याने  महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वीच महाविद्यालयाची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

 






"सत्संग शिक्षणाचा"

 "ध्यास गुणवत्तेचा !"

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा