संगमेश्वर पब्लिक स्कूलची गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात


 '' गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ''  या निनादात  संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या गणपती बाप्पांना  भावपूर्ण निरोप देण्यात आला. यामध्ये शाळेतले विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. सात दिवसांच्या विविध उपक्रमातून  वैविध्यपूर्ण स्पर्धा  घेण्यात आल्या.  या गणेशोत्सवाचे सांगता  बाप्पांच्या  विसर्जन मिरवणुकीने झाली.भारतीय संस्कृती व परंपरा यांची जपवणूक करणे व हस्तां
तर करणे याचा ध्यास मनी ठेवून संगमेश्वर पब्लिक स्कूल नेहमी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असते. सालाबाद प्रमाणे शाळेमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना उत्साहात करण्यात आली होती.  पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थिनींच्या  लेझीम पथकाने  या मिरवणुकीमध्ये उत्साही रंग भरले. या सादरीकरणासाठी शाळेचे नृत्य शिक्षक हरीश पुठ्ठा यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. ढोल ताशांच्या निनादात  संगमेश्वर पब्लिक स्कूल ची मिरवणूक सात रस्ता, कामत चौक ,एम्प्लॉयमेंट चौक, हुतात्मा चौक, मार्गे सिद्धेश्वर तलाव इथे पोहचली.विधिवत गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे संस्थापक धर्मराज काडादी , शितल काडादी, तेजश्री काडादी तसेच स्कुलच्या प्राचार्या प्रियांका समुद्रे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सोलापूर (दिनांक २५ )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा