संगमेश्वरमध्ये जागतिक पर्यटन दिन साजरा


पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळावी या उद्देशाने २७ सप्टेबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. जगभर पर्यटन विकास अत्यंत वेगाने होत असून लोकांना मिळणाऱ्या सुट्यांच्या काळात वाढ झाली असून आर्थिक आवकही वाढत आहे. शिक्षण, निवास व्यवस्था व वाहतूक सुलभ झाल्याने पर्यटन विकासाला अमर्याद संधी आहे असे विचार इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी मांडले. संगमेश्वर कॉलेजमध्ये भूगोल विभागाच्या वतीने जागतिक पर्यटन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कोकणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूगोल विभागप्रमुख डॉ. राजकुमार मोहरकर होते. 

पुढे कोकणे म्हणाले की,'' प्रत्येकाने किमान १० गडकिल्ले सर करावे. पर्यटन करत असताना ते पर्यावरण पूरक असावे. पर्यटनात स्थानिक लोकांना व त्यांच्या सेवांना महत्व द्यावे. सोलापूर जिल्हा हा देखील अनेक पर्यटन स्थळांनी समृद्ध असून त्याचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. पर्यटनाच्या माध्यमातून सोलापूरात उत्पादित होणारे चादर, टॉवेल, कडक भाकरी, शेंगा चटणी या उत्पादनाचा प्रचार व प्रसार करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करता येतात.''

कायर्क्रमाचे सूत्रसंचालन बिरप्पा सोनकडे , प्रास्तविक पाहुण्यांचा परिचय करून देत डॉ. शिवाजी मस्के यांनी प्रास्ताविक केले तर आभार महेश नरुटे मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.मंजू संगेपाग,प्रा.शिरीष जाधव,डॉ.वैभव इंगळे,प्रा.धनश्री कारळे यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉ. प्रकाश कादे,डॉ.राहुल साळुंखे,अजित कोकणे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.        



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा