हिंदी भाषेच्या माध्यमातून वाढत्या रोजगाराच्या संधी - डॉ. दरेप्पा बताले



हिंदी दिवसानिमित्त डिजिटल पत्रिकेचे उद्घाटन सोलापूर ( दैनिक संचार प्रतिनिधी ) '' हिंदी भाषा आज जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. दिवसेंदिवस जागतिक स्तरावर हिंदीचे महत्त्व वाढत आहे. ज्याप्रमाणे रोजगाराचे क्षेत्र विस्तारात आहे. त्याप्रमाणे ज्ञान, विज्ञानाबरोबर रोजगाराची भाषा म्हणून हिंदीचे महत्त्व अधोरेखित करता येईल. आज विज्ञान - तंत्रज्ञान, सरकारी कार्यालय, पत्रकारिता, फिल्म, उद्योग, जाहिरात, लेखन क्षेत्र,पर्यटन, टीव्ही पर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून हिंदी भाषा वापरली जाते. सिनेमापासून साहित्यपर्यंत, मोबाईल, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, वेब पोर्टल, अशा अत्याधुनिक दळणवळण विभागात हिंदी प्रभावी ठरते आहे. या विभागांमध्ये देखील वैविध्यपूर्ण रोजगाराच्या संधी आहेत. हिंदी ही रोजगाराची भाषा बनली आहे. दूरदर्शनवरील हिंदीचे स्थान दिवसेंदिवस ठळक होत आहे. त्यामुळे महाविद्यालयांचे त्यामुळे महाविद्यालयीन जीवनामध्ये युवकांनी हिंदी भाषा शिकण्यासाठी मनोभावे प्रयत्न केले पाहिजे. भारतीय स्वातंत्र्यापासून ते वर्तमानात राष्ट्रीय ऐक्याची मोट बांधणारी हिंदी भाषा एकविसाव्या शतकात नवनिर्माणाची भाषा ठरेल यात शंका नाही,'' असे मत डॉक्टर दरेप्पा बताले यांनी व्यक्त केले. ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदी राष्ट्रभाषा दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. मंचावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, संयोजक प्रा. शिवराज पाटील उपस्थित होते. प्रारंभी त्रिशा म्हेत्रे हिने प्रास्ताविक केले.वैष्णवीभरमगोंडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रिया पाटील हिने सूत्रसंचालन केलेतर संजीवनी बनसोडे हिने आभार मानले. याप्रसंगी हिंदी विभागप्रमुख संघप्रकाश दुडडे, प्रा.संतोष पवार, विद्यार्थीगण उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा