संगमेश्वर मध्ये रक्षाबंधन निमित्त मार्केटिंग एक्सपो कॉन्टेस्टचे आयोजन

 सोलापूर ( दिनांक 28 )

संगमेश्वर महाविद्यालय स्वायत्त सोलापूर मधील कॉमर्स विभागाच्या वतीने रक्षाबंधन पवित्र धाग्याचा सण या अनुषंगाने मार्केटिंग एक्सपो कॉन्टेस्ट आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे उदघाटन माननीय प्राचार्य डॉ. आर व्ही देसाई यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी माननीय प्राचार्यांनी पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक म्हणून गुलमोहरच्या झाडाला राखी बांधली. विद्यार्थ्यांनी व्यवसाय कसा करावा, आपल्या वस्तूचे मार्केटिंग कसे करावे, इ.चा प्रत्यक्ष अनुभव यावा या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. शिवाजी मस्के, प्रा. डॉ. आरती दिवटे, प्रा. राजश्री हुंडेकरी यांनी जबाबदारी पार पाडली. या कार्यक्रमाचे पहिले बक्षीस रोख रुपये 1500 व सर्टिफिकेट बीबीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी मिळवले तर दुसरे बक्षीस रुपये 1000 रोख व सर्टिफिकेट बी.कॉम. भाग दोन च्या विद्यार्थ्यांनी मिळविले. उत्तेजनार्थ दोन बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. डॉ. वंदना पुरोहित यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी कॉमर्स असोसिएशनचे समन्वयक प्रा. डॉ. आर. एम. खिलारे,मार्केटिंग फोरमचे प्रा. बसवराज हगरगुंडगी, प्रा. चेतन धुळखेडकर, प्रा. लता विटकर, प्रा. डॉ. सविता पाटील, प्रा. डॉ. महादेव खराडे, प्रा. डॉ. आसमा बागवान, प्रा. डॉ. वैशाली यांचे सहकार्य लाभले.

संगमेश्वर मध्ये रक्षाबंधनानिमित्त मार्केटिंग एक्सपो कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी डावीकडून प्रा. शिवाजी मस्के, प्रा. हुंडेकरी ,प्रा.आरती दिवटे ,कॉमर्स असोसिएशनचे समन्वयक प्रा. खिलारे , प्राचार्य आर. व्ही. देसाई  , उपप्राचार्य वंदना पुरोहित  उपस्थित होते.




 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा