चित्रकला कार्यशाळा उत्साहात

कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाचा उपक्रम  

सोलापूर (शहर संचार प्रतिनिधी - दि. १२ )  सात रस्ता येथील कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयात हौशी कलावंत, कलाशिक्षक, विद्यार्थ्यांना नव्या रंगाची ओळख व्हावी, यासाठी चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या चित्रकार कार्यशाळेत सुप्रसिध्द रामचंद्र खरटमल यांनी विद्यार्थ्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. रंगांचा प्रकार, रंगांचे लोडिंग, रंगांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, रंगांचा टवटवीतपणा टिकण्यासाठी कोणती पध्दत वापरावी, रंगाच्या छटा बनविण्यासाठी कसा अभ्यास करावा, त्या अभ्यासातून कौशल्य कसे निर्माण करावे, याची माहिती खरटमल यांनी दिली.

सोलापूर : अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी रामचंद्र खरटमल, प्राचार्य सचिन गायकवाड, विठ्ठल मोरे, धर्मराज रामपुरे, वर्षा बाकळे व अन्य.


एक चित्रकार म्हणून काम करत असताना त्या-त्यावेळी केलेल्या कामावर येणारा रंगांचा अनुभव खूप महत्त्वाचा ठरतो. रंग हाताळताना त्याची माहिती, त्याचा गुणधर्म कळणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी प्राचार्य सचिन गायकवाड यांनी या उपक्रमाची माहिती दिली. 

कोकियो कॅम्लिन कंपनीचे नंदकुमार गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खरटमल यांनी एचडी रंगांद्वारे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी दिलीप घेवारे, विठ्ठल मोरे, शेरशहा डोंगरी, धर्मराज रामपुरे, प्रवीण रणदिवे, यांनी आभार मानले. डॉ. सुहास सरवदे, धनराज काळे, वर्षा बाकळे, विपुल मिरजकर, विनायक घाटगे, अश्विनी लोंढे, मुकुंद सुरपूर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मीनाक्षी रामपुरे यांनी केले. प्रा. मल्लिकार्जुन सालीमठ यांनी आभार मानले.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा