तरुणांनो तुम्हीच उद्याच्या राष्ट्र उभारण्याचे शिलेदार आहात - ब्रिगेडियर अर्जुन मित्रा

 

 

संगमेश्वरच्या ९ महाराष्ट्र   NCC  बटालियनच्या विद्यार्थ्यांशी  संवाद

  सोलापूर (  दिनांक १२ ) ''  सप्टेंबर तरुणांनो तुम्हीच उद्याच्या राष्ट्र उभारणीचे शिलेदार आहात. एनसीसीच्या माध्यमातून राष्ट्र सेवेचे महान कार्य तुमच्या हातून होत आहे.  हे कदापिही विसरू नका. एनसीसी मुलांना एसएसबी अर्थात सर्विस सिलेक्शन बोर्डाच्या ,आर्म्ड फोर्सच्या परीक्षेपर्यंत घेऊन जाते. सोबतच सी आर पी एफ आणि एस आर पी एफ यासारख्या आर्मी सर्विसेसमध्ये तुम्हाला उत्तम करिअर आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्राविषयी आणि आपल्या सोबत, आपले कुटुंब समाज आणि सामाजिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी एनसीसी तुम्हाला घडवते. म्हणून  तुम्ही उद्याच्या राष्ट्र उभारणीसाठी सज्ज झाले पाहिजे .'' असा दिलखुला संवाद ग्रुप कमांडिंग ब्रिगेडियर अर्जुन मित्र यांनी साधला. ते 9 महाराष्ट्र बटालियनच्या  स्नेहसंमेलन प्रसंगी बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर  प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई,  एनसीसी ऑफिसर, प्राचार्य प्रियांका  समुद्रे आदी उपस्थित होते.










 प्रारंभी ब्रिगेडियर अर्जुन मित्रा यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर एनसीसी स्नेहसंमेलनासाठी जमलेल्या सर्व कॅडेट्सना त्यांनी संबोधित केले. मेजर चंद्रकांत हीरतोट यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा