वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा असा संदेश देत विद्यार्थ्यांचे प्रबोधन


 वाहनांचा वेग अनिवार झाला की अनेक अपघातांना निमंत्रण मिळते या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम सामान्य नागरिकांना कळावे आणि  त्याचे प्रबोधन करावे या हेतूने संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग प्रबोधन कट्टा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सात रस्ता इथल्या गजबजलेल्या ठिकाणी  हातामध्ये फलक घेऊन नागरिकांचे  प्रबोधन केले. जे वाहतुकीचे नियम पाळत आहेत त्यांचं कौतुक करून लोकांचे प्रबोधन करण्यात आले. यात  संगमेश्वर कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.  


उपप्रादेशिक परिवहनचे अधिकारी प्रशांत वनवे , तेजस्वीनी वायचळ, संगमेश्वर कॉलेज कला विभागाचे समन्वयक प्रा. शिवशरण दुलंगे, प्रा. हर्षवर्धन पाटील, प्रा. प्रदीप आर्य यांचा सहभाग होता. या उपक्रमासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांचे मार्गदर्शन लाभले.कनिष्ठ विभागाच्या समाजशास्त्र आणि संस्कृत विभागाच्या वतीने  हा उपक्रम राबवला गेला .






सोलापूर ( दिनांक २३ )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के