जिल्हास्तरीय वेब पेज डिझानिंग स्पर्धेत चंडकचे बावधनकर बंधू प्रथम

 


संगमेश्वर कॉलेजच्या व्यवस्थापन व संगणकशास्त्र विभागाचा उपक्रम

                        

सोलापूर प्रतिनिधी-  बदलत्या डिजिटल युगाबरोबरच आपल्याला  या तंत्रयुगाची माहिती व्हावी  या उद्देशाने  संगमेश्वर कॉलेज व्यवस्थापन व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने सॅन प्रतिभा शोध २०२४ अंतर्गत जिल्हास्तरीय  वेब पेज  डिझाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एसइएस चंडक पॉलिटेक्निकच्या अथर्व व प्रणव  बावधनकर बंधूंनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ.प्रमोद दर्गोपाटील म्हणाले, '' डिजिटल तंत्रज्ञानाबरोबर वेब डिझाइन महत्त्वाचे आहे. वेब डिझाईन मधील कुशल तंत्र तुमच्या ब्रँडवर परिणाम करतात उत्तम डिझायनिंग असलेले ब्रँड हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतात. तुम्ही वापर कर्त्यावर टाकलेली छाप त्यांना तुमच्या पेजवर राहण्यासाठी आणि तुमच्या व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रवृत्त करता. चांगली डिझाइन पेजवर लीड्स टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच वेब पेजद्वारे आपण ऑनलाइन व्यवसाय वाढवू शकतो. डिजिटल तंत्राच्या स्पर्धेत आपण टिकू शकतो.''  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा हे होते.



                                      निकाल - प्रथम - अथर्व  आणि प्रणव बावधनकर ( एसईएस चंडक पॉलिटेक्निक ), द्वितीय क्रमांक - ध्रुव गोरडिया आणि अमन रेंबरसू  ( हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स ) तृतीय -  सागर मुसळे आणि आकांक्षा कुलकर्णी ( संगमेश्वर  कॉलेज ) उत्तेजनार्थ - अंबादास गणपा अभिषेक कांबळे ( पी. के.मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) आणि शोएब इनामदार  स्वयम शालगर (चंडक पॉलिटेक्निक) विजेत्यांना रोख बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.   अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्र.प्राचार्य ऋतुराज बुवा यांनी  विद्यार्थ्यांना  इंटरनेट आणि संगणक युगातील झपाट्याने होत जाणारे बदल आणि त्यातील स्पर्धा  व व्यवसायाच्या संधी याबद्दल माहिती सांगून  शुभेच्छा दिल्या.



    या स्पर्धेत बार्शी, सांगोला, पंढरपूर, अक्कलकोट येथील २० पेक्षा जास्त महाविद्यालयातील सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी आणि सचिवा ज्योती काडादी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. परीक्षक म्हणून प्रा.श्रीपाद कुलकर्णी,प्रा.अंजली देशपांडे आणि संगमेश्वर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रणील तुंगा यांनी काम पाहिले.ही स्पर्धा यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख राजश्री हुंडेकरी,स्पर्धेचे संयोजक प्रा.बमनिंग बुक्का, प्रा.डॉ.संगिता जोगदे समन्वयक तसेच विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.  यावेळी प्रा. तारा आळंद- काडादी , रेखा पाटील , सोनाली पाटील ,अशा गव्हाणे , रोहिणी अन्यापनवार आदी  मान्यवर उपस्थित होते.









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा