शोधनिबंधातून विद्यार्थ्यांनी सादर केला केंद्रीय अर्थसंकल्प


संगमेश्वरमधील बीए  सिव्हिल सर्विसेस विभागाचा उपक्रम



  सोलापूर प्रतिनिधी 

- नुकताच  केंद्रीय अर्थसंकल्प 2024 अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सभागृहात सादर केला. त्यातील बारकाव्यांवर बी.ए. सिविल सर्विसेस विभागाच्या विद्यार्थ्यांनी  शोध निबंधाच्या सादरीकरणातून  वैशिष्ट्यपूर्ण  बाबी सांगून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.  यामध्ये अर्थसंकल्पावर दृष्टी टाकताना विद्यार्थ्यांनी  पीएम गतिशक्ती , पीएम गतिशक्तीचा राष्ट्रीय बृहत आराखडा, रस्ते वाहतूक, बहुपर्यायी लॉजिस्टिक पार्क, रेल्वे मार्ग, पर्वतमाला,  सर्वसमावेशक विकास यामध्ये शेती,  केन बेतवा नदी जोड प्रकल्प. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र , कौशल्य विकास, शिक्षण, आरोग्य , सक्षम अंगणवाडी,  प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठा,  सर्वांसाठी आवास,  चैतन्यपूर्ण गावे, बँकिंग, इ पारपत्र ,शहरी नियोजन, भूमी अभिलेख व्यवस्थापन , कंपनी बंद करण्यासाठीची प्रक्रिया वेगवान कशी करणार, दूरसंचार निर्यात प्रोत्साहन , संगणक क्षेत्रात आत्मनिर्भरता , ऊर्जा परिवर्तन आणि हवामान संबंधी कृती, सार्वजनिक भांडवल गुंतवणूक  अशा  बाबींचा समावेश होता.  याप्रसंगी उपप्राचार्य  प्रा. डॉ. सुहास पुजारी, अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख  प्रा.डॉ. संगीता कामत  उपस्थित होते.

  प्रारंभी प्रा. डॉ.वंदना भानप यांनी उपक्रमाचा हेतू थोडक्यात सांगितला. त्यानंतर  मार्गदर्शक परीक्षकांचा सत्कार झाला आणि विद्यार्थ्यांनी  अर्थसंकल्पावरील  आपले शोधनिबंध  सादर केले. अध्यक्षीय समारोप करताना सुहास पुजारी यांनी  या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून शोधनिबंध सादर केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी डॉ. संगीता कामत यांनी  अर्थसंकल्पातील बारकाव्यांवर  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की,''  विद्यार्थ्यांच्या मनातील सुप्त इच्छाशक्तींना प्रेरणा देऊन स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  मिळाले पाहिजे. विद्यार्थ्यांना आपण अर्थ साक्षर केले पाहिजे.''

हा उपक्रम यशस्वीतेसाठी बीए सर्विसेस विभागातील प्रा. नमिता बल्लाळ, विशाल राऊत, राहुल साळुंखे, रवींद्र म्हमाणे, महानंदा मोटगी आदींनी सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन राधिका सूर्यवंशी हिने केले तर आभार  पूजा कोळी यांनी मानले.  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा