संगमेश्वरमध्ये जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन जीनियस जंक्शन- द ॲपटी क्विझ स्पर्धा

आरती टिळे, श्रावणी घाणेकर विजेते संगमेश्वरच्या 

व्यवस्थापन व संगणक शास्त्राचा उपक्रम


 



सोलापूर प्रतिनिधी –

राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत विद्यार्थांना संधी मिळावी तसेच तार्किक तर्क, परिमाणात्मक विश्लेषण, गणितीय क्षमता आणि डेटा इंटरप्रिटेशन यासह विविध योग्यता डोमेनवर सहभागींची चाचणी घेणे  या उद्देशाने जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन जीनियस जंक्शन- द ॲपटी क्विझ स्पर्धा संपन्न झाली.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा होते.  

                                           विविध संघांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक संघात प्रत्येकी २  विद्यार्थ्यांचा समावेश होता.एकूण ११२ संघ उपस्थित होते. ही स्पर्धा फेरीनिहाय घेण्यात आली. प्रत्येक फेरीत २५ प्रश्न होते आणि प्रत्येक फेरीसाठी ३० मिनिटे सोडवण्याची वेळ होती. पहिली फेरी मॅथस रिझनिंगची होती दुसरी फेरी ॲपटी चॅलेंजस होती. तिसरी फेरी लॉजिकल रिझनिंगची होती चौथी फेरी डेटा इंटरप्रिटेशन ची होती.उपस्थित संघांमधून सहा अव्वल संघांची निवड करण्यात आली.शेवटी या संघांसाठी बझर फेरी घेण्यात आली.



स्पर्धेचे विजेते- प्रथम -  आरती टिळे, श्रावणी घाणेकर ( हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स ) द्वितीय  -  सोहम येमुल , हरिचरण कोला (संगमेश्वर कॉलेज ) तृतीय -  ढवळे रेश्मा. पाटील प्रेरणा (बी. पी. सुलाखे कॉलेज ऑफ कॉमर्स, बार्शी) उत्तेजनार्थ विजेते -प्रथम -  प्रतीक्षा जोशी  वैष्णवी शिंदे (संगमेश्वर महाविद्यालय) द्वितीय - रेणुका यादव,साक्षी लेंडे (वालचंद कला आणि विज्ञान महाविद्यालय) तृतीय - आदित्य दलभजन, रियान शेख (एचएन कॉलेज ऑफ कॉमर्स) विजेत्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 


या स्पर्धेत अक्कलकोट, बार्शी, पंढरपूर व सोलापूर येथील २०  पेक्षा जास्त महाविद्यालयातील  सुमारे २२४  विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अध्यक्षीय भाषणात  प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी स्पर्धा परीक्षेसाठी विषयाची संपूर्ण तयारी तसेच कठोर परिश्रमाची गरज असल्याचे सांगितले. स्पर्धेसाठी संस्थेचे चेअरमन माननीय श्री धर्मराज काडादी, व सचिव माननीय ज्योती काडादी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. परीक्षक म्हणून डॉ. एस.पी गाडे व डॉ. सौ.एस.एम. जोगदे  यांनी काम पाहिले. 

यावेळी प्रा. तारा आळंद-काडादी, प्रा. रेखा पाटील, प्रा.बमनींग बुक्का,प्रा.आशा गव्हाणे, प्रा. प्रिती शुकला, प्रा. सुमन साई, आदि मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विभाग प्रमुख प्रा. राजश्री हुंडेकरी, स्पर्धेचे संयोजक प्रा.रोहिणी अन्यापनावर आणि प्रा. वृषाली कुलकर्णी तसेच विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा