खेळाडूंच्या यशात कॉलेजची भूमिका महत्त्वपूर्ण : सुदेश मालप
संगमेश्वरचा ७१ वा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
सोलापूर, दि. १६- कोणत्याही कॉलेजमध्ये क्रीडा विभाग महत्वपूर्ण असतो. त्यामधून खेळाडू घडत असतात. ते विविध स्पघांमध्ये यश संपादन करतात. त्यांचे हे यश वैयक्तिक कष्ट, परिश्रम यावर अवलंबून असते. असे असले तरी कॉलेजने दिलेल्या सुविधा, शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेही खेळाडूला यश प्राप्त होते. म्हणून खेळाडूंच्या प्रत्येक यशामध्ये कॉलेजची महत्त्वपूर्ण भूमिका असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय व्हॉलिबॉल खेळाडू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडा संकुल, सोलापूरचे व्यवस्थापक सुदेश मालप यांनी केले. संगमेश्वर कॉलेजमध्ये आयोजित ७१ त्या क्रीडा पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, संस्थेच्या सचिवा ज्योती काडादी, उपाध्यक्ष डॉ. सी. वी. नाडगौडा, प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज युवा, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास गोठे, उपप्राचार्य प्रा. प्रसाद कुंटे, चित्रकला महाविद्यालय प्र. प्राचार्य सचिन गायकवाड, जिमखाना संचालक डॉ. आनंद चव्हाण, विद्यार्थी प्रतिनिधी रविकुमार मोरे, श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे सदस्य अॅड. आर. एस. पाटील, अनिल परमशेट्टी, श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याचे संचालक शिवशरण बिराजदार या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वरदा मोहळकर हिने गायलेल्या ईशस्तवन ग संगमेश्वरगीताने झाली. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. ऋतुराज युवा यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. शिवराज पाटील यांनी करून दिला.जिमखाना अहवाल व वरिष्ठ क्रीडा पारितोषिकाचे यादीवाचन प्रा. आनंद चव्हाण यांनी केले, प्रा. संतोष खंडे यांनी कनिष्ठ विभाग तर प्रा. शरण वांगी यांनी संगमेश्वर रात्र महाविद्यालयाच्या क्रीडा पारितोपिक यादीचे वाचन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकांचा व यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आरती दिवटे, प्रा. कोमल कोंडा व प्रा. संतोप पवार यांनी केले. तर आभार विद्यार्थी प्रतिनिधी रविकुमार मोरे याने मानले. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्याथों, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
- सोलापूर संगमेश्वर कॉलेजमध्ये आयोजित वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभात सुदेश मालप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी धर्मराज काडादी, ज्योती काडादी, डॉ. सी. वी. नाडगोडा, डॉ. ऋतुराज बुवा, डॉ. श्रीनिवास गोठे, प्रा. प्रसाद कुंटे, सचिन गायकवाड, डॉ. आनंद चव्हाण व रविकुमार मोरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा