संगमेश्वरचा ७१ वा वार्षिक शैक्षणिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

 विद्यार्थ्यांनी कौश्यल्यपूर्ण शिक्षणावर भर द्यावा - प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा

सोलापूर, दि.१६ फेब्रुवारी 

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सद्या देशभर होत आहे.  हे धोरण विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यांना वाव देणारे आहे.  विशेषतः विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता व कलासंपन्नता यांचा मिलाफ करणारे आहे.  या शैक्षणिक धोरणामध्ये नवनवीन अभ्यासक्रम तयार केले जात असून हे सर्व अभ्यासक्रम कौशल्याधिष्ठीत आहेत. अशा कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. कारण यातून आजच्या स्पर्धात्मक काळात यश मिळवता येईल, म्हणून विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण शिक्षणावर भर द्यावा. असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी मांडले. 



    संगमेश्वर कॉलेजमध्ये ७१ व्या शैक्षणिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास मंचावर श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. धनंजय माने, चेअरमन मा. धर्मराज काडादी, संस्थेच्या सचिव, मा. ज्योती काडादी, उपाध्यक्ष डॉ. सी.बी.नाडगौडा, प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, रात्र महाविद्यालय प्राचार्य डॉ. श्रीनिवास गोठे, उपप्राचार्य प्रा. प्रसाद कुंटे, चित्रकला महाविद्यालय प्र. प्राचार्य श्री. सचिन गायकवाड आणि विद्यार्थी प्रतिनिधी रविकुमार मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच मा.मंगलताई काडादी, मा. प्रकाश बिराजदार, मा. तारा काडादी, मा. डॉ. राजशेखर येळीकर, मा. राजशेखर पाटील, डॉ. राजेंद्र देसाई, प्रा. तोडकरी, प्रा.देवानंद चिलवंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. दामा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, चांगला अभ्यास करावा. ज्या संस्थेमध्ये आपण शिकत आहोत त्याविषयी आदर बाळगावा. व्यसनांपासून दूर रहावे. अभ्यासाबरोबर नव्या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करावे.  आपल्या जीवनाला यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावा असे प्रतिपादन केले. संगमेश्वर कॉलेजला क्रीडा क्षेत्राबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेची प्रदीर्घ परंपरा आहे. यामागे संस्थेचे मोठे योगदान असून त्याविषयी त्यांनी कौतुक केले.

    या कार्यक्रमाची सुरुवात कु. दिपा सालोठगीमठ व कु. कोळी हिच्या गणेशवंदनेने झाली. प्रस्ताविक व कॉलेजच्या वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्रीमती अनिता अलकुंटे यांनी करुन दिला. श्री. सिद्धाराम विजापुरे यांनी कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. व्ही. एन. मुलीमनी यांनी वरिष्ठ महाविद्यालय, प्रा.जी.एस. घनाते यांनी रात्र महाविद्यालय गुणवत्ता यादीचे वाचन केली.  यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी प्रतिनिधी रविकुमार मोरे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. आरती दिवटे, प्रा.कोमल कोंडा व प्रा. संतोष पवार यांनी केले. याप्रसंगी मोठया संख्येने विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पसायदानाने  कार्यक्रमाची सांगता झाली.








फोटो ओळ – बोलताना मंचावर मा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, अॅड. धनंजय माने, मा. धर्मराज काडादी, मा.ज्योती काडादी, डॉ. सी.बी.नाडगौडा, डॉ. ऋतुराज बुवा, डॉ. श्रीनिवास गोठे, प्रा. प्रसाद कुंटे, श्री. सचिन गायकवाड आणि रविकुमार मोरे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा