संगमेश्वर कला महोत्सव उत्साहात साजरा

 सोलापूर: संगमेश्वर कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिनांक ६ व ७ मार्च  २०२४ रोजी संगमेश्वर कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक ०६ रोजी प्र.प्राचार्य ऋतुराज बुवा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धेची सुरुवात झाली. या महोत्सवात गायन, नृत्य, रांगोळी, वक्तृत्व व अभिनय अशा पाच प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत एकूण १०९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.या महोत्सवाच्या बक्षिस वितरणास प्रसिध्द शास्त्रीय गायक  पंडित दीपक कलढोणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी गायन व एकूणच सर्व प्रकारच्या कालाप्रकाराबाबत विचार व्यक्त करतांना सांगितले की, “ जीवनात कलेचे महत्व अनन्यसाधारण आहे.कला माणसाला माणूस बनवते..” यावेळी गायन कसे करावे याचे प्रात्यक्षिक ही दाखिवले.

 स्पर्धेचा निकाल   - गायन - स्वरदा मोहोळकर (प्रथम) आदिती कुलकर्णी व सलोनी पानपाटील (द्वितीय) प्रिया पाटील व अलोक महिंद्रकर ( तृतीय ) नृत्य स्पर्धेत - सुलोचना राठोड (प्रथम) द्युथी कनाकोत्ती- (द्वितीय )सोनाली जाधव (तृतीय) आरती-अर्पिता व महेश्वरी वाडी  (उत्तेजनार्थ )अभिनय स्पर्धेत- गायत्री मेट्रे ( प्रथम ) जैद हसन शेख -( द्वितीय) आदित्य पांडे (तृतीय) वक्तृत्व स्पर्धेत  - रुचा बिराजदार  (प्रथम ) सीमा गवळी (द्वितीय ) गायत्री मेट्रे  (तृतीय) 

या स्पर्धेचे परीक्षण बळवंत जोशी, निखील भालेराव,संगमेश्वर बिराजदार, ऋतुराज व्हरकट, ममता बोल्ली, प्राची जेवूरे, महेश क्षीरसागर,अभिजित केंगार यांनी केले. या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी उपप्राचार्य डॉ.सुहास पुजारी, प्रा.विष्णू विटेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.दादासाहेब खांडेकर उपस्थित होते. हा महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेले व्यासपीठ होते.ज्यात ११ वी पासून पदव्युत्तर पर्यंतचे संगमेश्वर कॉलेज मधे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.हा कला महोत्सव यशस्वी व्हावा या साठी विद्यार्थी कलाकार जैद हसन शेख, सलोनी पानपाटील, दीपा सलोटगीमठ,संजना गायकवाड, रूद्र बेसरे, प्रांजल तांबके, गायत्री मेट्रे, आदित्य पांडे, तेजस कदम, प्रज्योत झाडे, अपूर्वा तळवार यांनी परिश्रम घेतले.  










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा