अर्जुन एकांकिकेने पटकाविला प्रथम क्रमांक

नाट्य परिषद मुंबई आयोजित शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनांतर्गत राबविलेल्या जागर या एकांकिका स्पर्धेत थिएटरकर सोलापूर यांनी सादर केलेल्या अर्जुन या एकांकिकेने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला असून याचे लेखन आणि दिग्दर्शनअभिजित केंगार यांनी केले आहे. या एकांकिकेत संगमेश्वर महाविद्यालयातील जैद शेख, सलोनी पानपाटील, श्रावणी पदकी, ऋचा साळुंके या विद्यार्थी कलावंतांनी तसेच अभिजित केंगार, अदिती सरदेशमुख, शुभम दोडतले, विठ्ठल पुजारी, अभिजित दुपारगुडे, संजय केंगार, कुणाल बाबरे, सावनी देशपांडे, अश्विनी बनसोडे, राजाभाऊ जाधव यांनी यशस्वी भूमिका साकारली असून या सुंदर एकांकिकेस अनुद सरदेशमुख आणि जैद शेख यांचे पार्श्वसंगीत होते. या उत्साही आणि कलाप्रेमी यशस्वी संघाचा संगेमश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य ऋतुराज बुवा आणि प्रा. डी. एस. खांडेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.सोलापूर, दि. २४

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

ऐतिहासिक वास्तूंमधून अनुभवला सोलापूरचा ऐतिहासिक वारसा

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा