समाजाभिमुख शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करावेत : युवा व्याख्याते गणेश शिंदे
कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन
संचार प्रतिनिधी
▶ सोलापूर, दि. २७-
सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी
केवळ शिक्षणातूनच उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी शिक्षक आणि पालकांनी मुलांना केवळ
पुस्तकी ज्ञान न देता समाजाभिमुख व संस्कारक्षम शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करावेत,
असे
आवाहन प्रसिध्द युवा व्याख्याते गणेश शिंदे (पुणे) यांनी केले.
मंगळवारी, संगमेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात श्री सिध्देश्वर देवस्थान व श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित कर्मयोगी अप्पासाहेव काडादी प्रबोधन मंचच्यावतीने कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात शिंदे बोलत होते. 'बदलती शिक्षण पध्दतीशिक्षक व पालकांची भूमिका' असा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. यावेळी व्यासपीठावर श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष व संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. धनंजय माने, श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज ऊर्फ पुष्पराज काडादी, उमादेवी काडादी, श्री सिध्देश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य भीमाशंकर पटणे, प्रा. डॉ. राजशेखर येळीकर, सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु डॉ. इरेश स्वामी, संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य अॅड. आर. जी. म्हेत्रस, उपस्थित होते.
संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवायांनी प्रास्ताविकेतून कर्मयोगी अप्पासाहेव काडादी यांच्या समाजाभिमुख जोवनकार्याची माहिती दिली.यावेळी शिंदे म्हणाले, आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना घडवत असताना शिक्षकांनी चौकटीच्या बाहेर जाऊन विद्याथ्यांना समाजाचे जागरूक नागरिक बनवावे. उदरनिर्वाह हा शिक्षणातील प्राथमिक टप्पा असून उद्दिष्ट नाही हे पालकांनी लक्षात ठेवावे. केवळ माकांसाठी धडपड न करता समाजातील चांगल्या गोष्टीही मुलांना दाखविल्या पाहिजेत. आदर्श सांगून नाही तर स्वतःच्या वागण्यातून निर्माण करावा लागेल. विशेष करुन पालकांनी मुलांना मोवाइलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्याशी सुसंवाद साधत मोठी स्वप्ने दाखवा, असे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम महाराजांची उदाहरणे दिली. आजकाल समाजात वदल चटकन घडतात. या वदलांना समोरे जाताना स्वतः ला अद्ययावत ठेवून जीवनातील आव्हानांना हसतमुख सामोरे जाण्याचा मूलमंत्रही त्यांनी दिला.
प्रारंभी अलका अरगडे यांनी वचन गीत सादर केले. उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास पुजारी यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सरस्वती वताले व सविता विराजदार यांनी केले. तर आभार सिध्देश्वर प्रशालेचे उपमुख्याध्यापक राजकुमार उंबरजे यांनी मानले. या व्याख्यानास श्री सिध्देश्वर देवस्थान शिक्षण संकुल, श्री संगमेश्वर शिक्षण संकुल, श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना शिक्षण संकुलातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूर संगमेश्वर महाविद्यालयात कर्मयोगी
अप्पासाहेब काडादी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानाचे उद्घाटन
अप्पासाहेबांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी धर्मराज काडादी, व्याख्याते
गणेश शिंदे, अॅड. धनंजय माने, अण्णाराज ऊर्फ
पुष्पराज काडादी, डॉ. इरेश स्वामी, भीमाशंकर पटणे,
प्रा.
डॉ. राजशेखर येळीकर, अॅड. आर. जी. म्हेत्रस, प्राचार्य
ऋतुराज बुवा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा