६५ वा महाराष्ट्र दिन उत्साहात उपस्थितांनी घेतली मतदानाची शपथ


सोलापूर (दिनांक १  मे २०२४)  ६५ वा महाराष्ट्र दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला.याच कार्यक्रमात भारत निवडणूक आयोगाच्या वतीने  मतदान करण्याची उपस्थित सर्वांनी शपथ घेतली. याप्रसंगी रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. श्रीनिवास गोठे, उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी  डॉ. दत्तकुमार म्हमाणे ,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य  प्रा. प्रसाद कुंटे, आदी मान्यवर उपस्थित होते.

          प्रारंभी मेजर चंद्रकांत हिरतोट यांनी रूपरेषा सांगितली. प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.राष्ट्रगीतानंतर ' भारत माता की जय ' ही सलामी देण्यात आली.  त्यानंतर मतदानाच्या शपथेचे वाचन प्राचार्यांनी केले, उपस्थित सर्वांनी मतदान करण्याची शपथ घेतली.त्यानंतर प्राचार्यांनी   आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची निर्मिती स्वातंत्र्यानंतर सहजपणे झालेली नव्हती असे सांगत  ऐतिहासिक घटनांचा धांडोळा घेत आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व विभागातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा