दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये उत्साहात साजरासोलापूर ( दिनांक २१ )  दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला.  ९ महाराष्ट्र एनसीसी बटालियन , संगमेश्वर वरिष्ठ महाविद्यालय, संगमेश्वर रात्र महाविद्यालय संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालय विभाग  या संस्थांच्या वतीने संगमेश्वर कॉलेजच्या प्रांगणामध्ये  योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते . या प्रात्यक्षिकासाठी  योगशिक्षक शिवराज पाटील यांनी  मार्गदर्शन केले . प्रारंभी  आजच्या योग दिनाचा हेतू  प्राचार्य  डॉ. ऋतुराज बुवा यांनी सांगितला आणि त्यानंतर प्रात्यक्षिकास प्रारंभ झाला. या प्रात्यक्षिकामध्ये  निरोगी जीवनासाठी उपयुक्त असलेल्या वेगवेगळ्या आसनांचा  आणि त्याच्या विश्लेषणाचा परामर्श घेण्यात आला.  योग विभागातील विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक केले. त्यांच्यासोबत उपस्थित शिक्षक विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाचे सादरीकरण  केले.  शेवटी  हा उपक्रम  पार पाडण्यासाठी  ज्यानी योगदान दिले त्यांचा सत्कार  प्राचार्यांच्या हस्ते झाला.  याप्रसंगी  प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे डीन डॉ. वसंत कोरे,उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी, कनिष्ठ विभागाचे  उपप्राचार्य  प्रसाद कुंटे, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोठे,  एनसीसी विभागाचे  गनबहादूर  गुरूंग , जिमखाना विभागाचे प्रमुख डॉक्टर आनंद चव्हाण यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा