कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाचे चित्र प्रदर्शनात सुयश


पौर्णिमा शहारवाले , विजय मंगरूळे , सोनाली रामपुरे , तेजस्विनी व्हनमराठे

या विद्यार्थ्यांच्या चित्रांची  मान्सून शो चित्र प्रदर्शनात निवड

कर्मयोगी .अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांच्या चित्रांची  मान्सून शो चित्र प्रदर्शनात निवड करण्यात आले . पौर्णिमा शहारवाले , विजय मंगरूळे , सोनाली रामपुरे , तेजस्विनी व्हनमराठे ( सर्व विद्यार्थी जी. डी . आर्ट डिप्लोमा पेंटिंग )  या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे पेंटिंग  प्रतिवर्षी मानसून शो आयोजित केला जातो या प्रदर्शनासाठी  चार विद्यार्थ्यांच्या चित्रांची निवड झालेली आहे . चित्रांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

                 चित्रकला महाविद्यालयाचे अध्यक्ष धर्मराज काडादी साहेब यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्याचप्रमाणे प्राचार्य सचिन गायकवाड यांनी सुद्धा यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन केले.  दिनांक 18 जून ते 27 जून पर्यंत मुंबई येथील प्रख्यात जहांगीर आर्ट गॅलरी येथे सदर महाराष्ट्रातील निवडक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे निवडक चित्रांचे प्रदर्शन पार पडले . याप्रसंगी अनेक मान्यवर व्यक्तींनी हा चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी भेट दिली याबद्दल संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा