देश सेवेसाठी सदैव तत्पर रहा : लेफ्टनंट कर्नल शरभ बाबर
9 महाराष्ट्र बटालियन चे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल शरद बाबर यांनी संगमेश्वर कॉलेजला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
एनसीसीच्या कॅडेट्सनी त्यांना मानवंदना देऊन त्यांचे स्वागत केले याप्रसंगी संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा तसेच एनसीसी विभाग प्रमुख विभाग प्रमुख कॅप्टन शिल्पा लब्बा, एनसीसी ऑफिसर जोहिल जाधव उपस्थित होते.
ले.कर्नल शरभ बाबर यांचा सत्कार संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा सर यांच्या हस्ते झाला तसेच ट्रेनिंग जेसीओ गळवे व हवालदार सिंग यांचा सत्कार करण्यात आला.
ले.कर्नल शरभ बाबर यांनी कॉलेजचा उत्कृष्ट कामगिरीचा आढावा जाणून घेतला व त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच एनसीसी ऑफिसर कॅप्टन शिल्पा लब्बा यांचे कामाचेही कौतुक त्यांनी केले. आजवर संगमेश्वर कॉलेजच्या एनसीसी युनिटच्या माध्यमातून आर्मी ,नेव्ही ,एअर फोर्स, सीआरपीएफ, बीएसएफ, अग्निशामन दल, रेल्वे पोलीस, महाराष्ट्र पोलीस अश्या अनेक क्षेत्रामध्ये अधिकारी म्हणून एनसीसी कॅडेट्स भरती झाले आहेत
लेफ्ट. कर्नल बाबर यांनी एनसीसी कॅडेट्सला डिसिप्लिन, ट्रेनिंग, आर्मी नेव्ही, एअर फोर्स,NDA अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सेवेच्या संधी कशा मिळू शकतात तसेच एनसीसी मुळे होणारे फायदे व भविष्यातील संधी त्याबद्दल विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
ले. कर्नल शरभ बाबर यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील अनुभव एनसीसी कॅडेट्स ना सांगितले. विद्यार्थ्यांनी देश सेवेसाठी कायम तत्पर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅडेट अक्षदा बोरगी व सूत्रसंचालन तनुश्री बिराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन सीएचएम कोमल बन्ने यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा