विद्यार्थ्यांनी अल्कोहोल इंडस्ट्रीतील नव्या संधींचा फायदा घ्यावा - उत्कर्ष भावसार

संगमेश्वर मध्ये अल्कोहोल टेक्नॉलॉजी डिप्लोमा कोर्स प्रमाणपत्र प्रदान समारंभ संपन्न


सोलापूर प्रतिनिधी - 

आजच्या काळात व्यावसायभिमुख शिक्षण महत्त्वाचे बनलेले आहे. कौशल्यावर आधारित कोर्सच्या माध्यमातून याची पूर्तता होते. अलीकडे साखर उद्योगाबरोबर अल्कोहोल इंडस्ट्रीज ही नवीन शाखा निर्माण झालेली आहे.  त्यामध्ये अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अल्कोहोल टेक्नॉलॉजी डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी साखर कारखान्यांमध्ये नोकरीचा शोध घेण्याबरोबर अल्कोहोल क्षेत्रातील नव्या संधींचा फायदा घ्यावा असे विचार फ्रट्रेली कंपनीचे सहायक व्यवस्थापक  मा. उत्कर्ष भावसार यांनी मांडले.  संगमेश्वर कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२- २०२३ पासून सुरू केलेल्या पोस्ट् ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इन्डेस्ट्रीयल फर्मेनटेशन अल्कोहोल टेक्नॉलॉजी च्या पहिल्या बॅचच्या प्रमाणपत्र वाटप समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. धर्मराज काडादी होते. या प्रसंगी सौ. श्रुतिका भावसार, सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. समीर सरगर, संस्थेचे शैक्षणिक सल्लागार डॉ. प्रमोद दर्गोपाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा हे मान्यवर् उपस्थित होते. 


मा. भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सद्याच्या काळातील व्यावसायिक क्षेत्रातील परस्थितीचे दर्शन घडविले. नव्या काळामध्ये साखर कारखान्यांबरोबरच अल्कोहोल उद्योगातील निर्माण झालेल्या व्यावसायिक संधींची ओळख करून दिली. या क्षेत्रात प्रशिक्षित तरुणांची खूप मोठी गरज आहे. त्यामुळे नव्या विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची सुरवात करताना पगार, पैसा याचा विचार न करता संधीचा फायदा घ्यावा. अनुभवसंपन्न व्हावे. यातूनच पुढे अनेक संधी त्यांना मिळू शकतात. असे विचार मांडले. अध्यक्षीय मनोगतात मा. धर्मराज काडादी यांनी अल्कोहोल टेक्नॉलॉजी कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कोर्सच्या माध्यमातून साखर उद्योगामध्ये आवश्यक् असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग मिळेल. याचा फायदा येणा-या पिढयांना होईल. असे मत मांडले. 

कार्यक्रमाची सुरुवात संगमेश्वर् गीताने झाली. पाहुण्यांचे स्वागत प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज यांनी केले. प्रास्ताविक समन्वयक डॉ. प्रताप गोरेपाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. गौरी जमादार यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. मृणाल कुलकर्णी व अस्मिता बिराजदार यांनी केले. तर आभार रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. उध्दव मंडले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. दत्तकुमार म्हमाणे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी, भूगोल विभागप्रमुख डॉ. राजकुमार मोहरकर, प्रा. संतोष पवार, डॉ.अप्पासाहेब ढोणे, डॉ. आरती दिवटे, डॉ. महानंदा बगले, प्रा.शहानुर शेख आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा

भाषिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो अश्विनी मोरे