संगमेश्वर कॉलेजमध्ये विद्यार्थी संवाद अभियान संपन्न

                                  


  स्मार्ट करिअर घडवण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल.

                                                                     --   यशवंत शितोळे

  सोलापूर प्रतिनिधी  

'' पारंपारिक कॉलेज शिक्षणाबरोबरच स्मार्ट करिअर घडवण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड दिली तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. यासाठी महाविद्यालयीन जीवनापासून आपण  वेगवेगळ्या क्षेत्रातील तंत्रज्ञान  याविषयी अभ्यासून  प्रात्यक्षिक कसे करता येईल, संगणक आणि इंटरनेटचा वापर कसा करता येईल हे पाहणे  महत्त्वाचे आहे .आपल्या हातातील मोबाईल  याचाही  तंत्रज्ञानातील एक  यंत्र म्हणून कसा करता येईल याकडे आपण पाहणे गरजेचे आहे.'' असे प्रतिपादन यशवंत शितोळे यांनी केले  संगमेश्वर कॉलेजमध्ये  आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग  आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने  करिअर कट्टा आयोजित विद्यार्थी संवाद    या कार्यक्रमात ते बोलत होते.

संगमेश्वर महाविद्यालय (स्वायत्त) सोलापूर  व महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग  आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने  करिअर कट्टा आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य मा.डॉ.ऋतुराज बुवा व शैक्षणिक व मूल्यमापन सल्लागार डॉ.प्रमोद दर्गोपाटील यांनी शुभेच्छा दिल्या, विद्यार्थी संवाद उपक्रमात संवाद साधताना मा.यशवंत शितोळे अध्यक्ष महारष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी विद्याथ्यांना करिअर कट्ट्याच्या माध्यमातून भविष्यातील नोकरीच्या संधी व उद्योगाच्या संधी याबरोबरच करिअर आपल्या मोबाइलवर घेताना आयएएस आपल्या भेटीला या मध्ये विविध अधिकारी मार्गदर्शन करीत असतात, विविध स्पर्धा परीक्षा तयारी, तसेच उद्योजक आपल्या भेटीला यामध्ये यशस्वी उद्योजक आपल्याला मार्गदर्शन करीत असतात, ऍड ऑन कोर्सेस व इतर विविध प्रकारच्या कोर्सेसची माहिती दिली.अणि इतर कौशल्य विकास, मूल्य, संस्कार रुजवणारे उपक्रम हेच विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यास उपयुक्त आहेत. विद्यार्थ्यांनी हे सर्व करत असताना  स्मार्ट फोन चा वापर  त्याचा स्मार्ट वापर केला तर स्मार्ट करिअर घडेल असे मत व्यक्त केले. 

                             विद्यार्थी संवाद अभियानाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.वंदना पुरोहित हे होते. या वेळी सोलापूर जिल्हा ग्रामीण करिअर कट्टा समन्वयक प्रा. युवराज सोलापूरे, दक्षिण सोलापूर तालुका करिअर कट्टा समन्वयक प्रा.संगीता बावगे ,छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय करिअर कट्टा समन्वयक डॉ. वाल्मिकी किर्तीकर व डॉ.सुनील शर्मा व करिअर संसद पदाधिकारी, वि.गु.शिवदारे महाविद्यालय करिअर कट्टा समन्वयक डॉ.वैशाली वराडे व करिअर संसद पदाधिकारी, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सारीपुत्र तुपेरे, डॉ. मकानदार,प्रा.इरेशा शेळगे,प्रा.बसवराज हसरगुडी, प्रा.नविता बल्लाळ  व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा