संगमेश्वर कॉलेजमध्ये 'जगाचा पोशिंदा शेतकरी: शेतमालाचे मार्केटिंग' स्पर्धा संपन्न
संगमेश्वर महाविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे 'शेतातून थेट कॉलेजात' या संकल्पनेवर महाविद्यालयातील ग्रामीण विद्यार्थ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला, फळे, फुले, धान्य अणि प्रक्रियायुक्त शेतीमाल आपल्या शेतातून थेट कॉलेजात आणून विक्री केला व आपली विक्री कौशल्ये सादर केले.
या स्पर्धेचे उद्घाटन लोकमंगल अॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट कॉलेजचे प्राचार्य डॉ. सचिन फुगे व संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर पी बुवा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आ
ले. याप्रसंगी कॉमर्स विभागाचे उपप्राचार्य डॉ. वंदना पुरोहित व कॉमर्स असोसिएशनचे समन्वयक डॉ. राजकुमार खिलारे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून उपस्थित असलेले डॉ. सचिन फुगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या शेतात पिकणाऱ्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतीमाल प्रक्रिया करून शेतीमालाचे मूल्यवर्धन करू शकतो. त्यासाठी विपणन कौशल्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांनी ते विकसित करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.या स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्वेता अरेनाड या विद्यार्थिनीने मिळविले. द्वितीय क्रमांक ऐश्वर्या पुजारी तर तृतीय क्रमांक रोहित शिंदे व शुभम गायकवाड या विद्यार्थ्याने पटकाविले. या स्पर्धेत 40 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सीए महादेव खराडे प्रा. बसवराज हगरगुंडगी, प्रा. चेतन धूळखेडकर, प्रा. डॉ. सविता पाटील, प्रा. लता विटकर, प्रा. डॉ. पार्वती शेटे, प्रा. शरयू भिसे आदींनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा