कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयात गणरायाचे आगमन
कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 'रंग गणेशाचा' या चित्रप्रदर्शनाचे आयोजन
सोलापूर प्रतिनिधी - कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयात गणरायाचे आगमन झाले. विधीवत प्राणप्रतिष्ठापना संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य सचिन गायकवाड, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ऋतुराज बुवा, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे,निवृत्त उपप्राचार्य आनंद हुली ,निवृत्त कलाशिक्षक मल्लिनाथ बिलगुंदी, चित्रकार प्रा. देवेंद्र निम्बर्गीकर, प्रा. मीनाक्षी रामपुरे उपस्थित होते.
प्रारंभी कला महाविद्यालयाच्या बाहेरील बाजूस नामवंत चित्रकारांच्या व्यक्तीचित्राचे आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या पोट्रेटचे अनावरण झाले. विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवानिमित्त काढलेल्या 'रंग गणेशाचा' या चित्रप्रदर्शनाचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले. गणरायाची आरती झाली. कला महाविद्यालयाची गणेशोत्सवाची परंपरा आणि पंचवीस वर्षाचा धावता आढावा घेत देवेंद्र निम्बर्गी यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकानंतर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. निकाल -प्रथम - कैवल्य अयाचित ११ वी कला, द्वितीय- सार्थकी चिलवेरी- फौंडेशन, तृतीय राजेश गंगुल - एलिमेंटरी , केतकी तेलगांवकर -डिप्लोमा पेंटिंग.
यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना धर्मराज काडादी म्हणाले की,'' कलाक्षेत्रातील पुढचे शिक्षण पुण्या- मुंबईला जाण्यापेक्षा सोलापुरात मिळण्यासाठी आपले महाविद्यालय प्रयत्नशील आहे. लवकरच पुढील शिक्षण आपल्या सोलापुरात मिळण्याची व्यवस्था करण्यात येईल. बक्षीस पात्र सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! ''
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्राचार्यांच्या दालनात गणेश पूजा झाली. याप्रसंगी प्रा. मीनाक्षी रामपुरे प्रा. मल्लिकार्जुन सालीमठ,प्रा.आशिष माशाळे, लिपिक श्रीपती गोटे, राहुल कराडे, वैजनाथ स्वामी यांच्यासह वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा