विज्ञान प्रयोगातूनच भविष्यातील संशोधक घडतील - रवी पवार


संगमेश्वरमध्ये विज्ञान प्रदर्शन, इस्रोची 'स्पेस ऑन व्हील' बस







सोलापूर प्रतिनिधी -दिनांक २० 

 '' शालेय जीवनापासूनच वैज्ञानिक दृष्टी निर्माण करत पालकांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावली आणि विद्यार्थ्यांनी ती आत्मसात केली तर नक्की या विज्ञान प्रयोगातून भविष्यातील संशोधक घडतील. वेगवेगळ्या क्षेत्रातील तंत्रज्ञान या प्रयोगशीलतशील पुढे येतील त्यातूनच राष्ट्र उभारणी  उभारणीला हातभार लागेल.''असे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज आणि सोलापूर सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा,  उपप्राचार्य  प्रसाद कुंटे    सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. वैशाली धायगुडे,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.


                           प्रारंभी प्रसाद कुंटे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा सत्कार झाला. त्यानंतर फिजिक्स , इलेट्रॉनिक्स ,केमिस्ट्री या वेगवेगळ्या  च्या दालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले . यावेळी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन लीना खमितकर यांनी केले.

चौकट--  

इस्रोची 'स्पेस ऑन व्हील' पाहण्यासाठी गर्दी होत.

अंतरिक्ष महायात्रा अंतर्गत  विज्ञान भारती आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो  यांचा संयुक्त उपक्रम असलेली 'स्पेस ऑन व्हील'  ही बस संगमेश्वर मध्ये आज दिवसभर उपलब्ध असणार आहे.  प्रक्षेपणयान (लॉन्च व्हेईकल) ,प्रक्षेपण तळ (launch pads), उपग्रह उपयोग - दूरस्थ संप्रेषण ,उपग्रह उपयोग - संदेशवहन, नाविक (NaVIC) स्वदेशी स्थितीदर्शक यंत्रणा , मंगलयान , चांद्रयान १, चांद्रयान -३, आर्यभट्ट, रोहिणी भास्कर हे भारतीय उपग्रह , उष्णतारोधी कवच , विकास इंजिन पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी गर्दी केली होती.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा