डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक सलग मिळवण्याचा मान संगमेश्वर कॉलेजला
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यापीठाने केला गौरव
--पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यामध्ये यावर्षी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोत्कृट कामगिरी केल्याबद्दल संगमेश्वर कॉलेजला पुरस्कार सुरू झाल्यापासून सलग डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठातील प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे,प्रभारी क्रीडा संचालक डॉ. केदारनाथ काळवणे हे मान्यवर उपस्थित होते. संगमेश्वर कॉलेजच्या वतीने प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. आनंद चव्हाण आणि यशस्वी खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते. संगमेश्वर कॉलेजला उज्जवल, गौरवशाली क्रीडा परंपरा आहे. गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन करणारे खेळाडू कॉलेजमधून घडलेले आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधीची उपलब्ध्दता निर्माण करून दिली जाते. कॉलेजच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सचिव प्रा. ज्योती काडादी, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा