विद्यार्थ्यांचा स्वयंरोजगारावर संशोधकाशी संवाद

 सोलापूर दिनांक २५ -  ''कॉफी संशोधन ब्रिटिश काळापासून सुरू आहे. १९२५  पासून  हे राष्ट्रीय केंद्र बेंगलोर येथे कार्यरत असून शेती करणाऱ्या युवकांना तसेच संशोधन क्षेत्रात नवे रोजगार मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी संशोधकांना या क्षेत्रात अनेकविध संधी आहेत. त्याचा फायदा घ्यावा. कला., वाणिज्य, विज्ञान क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमानंतर  या कॉफी संशोधन क्षेत्रात आपलं करिअर करता येतं ''असे प्रतिपादन राष्ट्रीय कॉफी संशोधन केंद्र बंगळूरूचे तरुण संशोधक  ( वाळूज तालुका  - मोहोळ )  किशोर मोटे यांनी केले. ते  संगमेश्वर कॉलेज भूगोल विभागामार्फत ' संशोधनातील स्वयंरोजगार '  या विषयावर संवाद साधत होते.  व्यासपीठावर उपप्राचार्य  प्रा.डॉ. सुहास पुजारी,  भूगोल  शिक्षक संघटनेचे  ज्येष्ठ प्रा.डॉ.के.एम.जमादार, भूगोल विभागप्रमुख डॉ. राजकुमार मोहोरकर, प्रा. हरीश  तिपे आदी मान्यवर उपस्थित होते.

  प्रारंभी प्रा.डॉ. राजकुमार मोहोरकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केलं. त्यानंतर  प्रमुख पाहुण्यांची ओळख  सीमा गवळी या विद्यार्थिनीने करून दिली . दीप प्रज्वलनानंतर  प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. भूगोल शिक्षक संघ आणि संगमेश्वर कॉलेज भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांचा याच कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.  निकाल -   प्रथम - अनुपमा अशोक पाटील  ( बी.एड.  द्वितीय वर्ष, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन)   द्वितीय -   प्रथमेश विष्णु पुरुड ( बी.ए. सिविल सर्विसेस, संगमेश्वर कॉलेज ) तृतीय-   अस्मिता काशिनाथ खट्टे   ( संगमेश्वर कॉलेज )  चतुर्थ- पूजा गोवर्धन लोंढे  ( देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय, मोहोळ )  पाचवा क्रमांक -  पल्लवी श्रीपाद पंतोजी  ( संगमेश्वर कॉलेज )

त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या  प्रश्नांना पाहुण्यांनी उत्तरे दिली. याच कार्यक्रमात  कॉफी उद्योग विश्वातील एक ध्वनी चित्रफित विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.

                 अध्यक्षीय समारोपात उपप्रचार्य  प्रा.डॉ.सुहास पुजारी यांनी भूगोल विभागाच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा  उपक्रमाचे कौतुक केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी या नामी संधीचा उपयोग करून घ्यावा असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रा. डॉ. संघप्रकाश दुड्डे ,प्रा.संतोष मेटकरी, प्रा.डॉ.शिवाजी मस्के,डॉ.मंजू संगेपाग, प्रा.संतोष पवार,प्रा.विठ्ठल आरबाळे,प्रा.डॉ. प्रकाश कादे, प्रा.डॉ. वैभव इंगळे, प्रा. डॉ.  शिरीष जाधव, प्रा. डॉ. राहुल साळुंके ,प्र. रिद्धी बुवा ,धनंजय बच्छाव यांच्यासह भूगोल विभागातील  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन  स्नेहा उपासे, सारिका करजगी  या विद्यार्थिनींनी केले तर आभार  विशाल काशीद  यांनी मानले.



 भूगोल शिक्षक संघ आणि संगमेश्वर कॉलेज भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांचा याच कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी कॉफी संशोधक किशोर मोटे, प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, यांच्यासह विजेते आणि मान्यवर



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के