कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि कर्मयोगी अप्पासाहेब यांना अभिवादन

 


मराठी भाषा गौरव दिन ... मराठीची थोरवी ही अनन्यसाधारण आहे

                                                                           --कवी माधव पवार 

सोलापूर प्रतिनिधी - 

  ''मराठी ही पुरातन भाषा आहे.मराठीची थोरवी ही अनन्यसाधारण आहे. तिच्या संवर्धनासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. कथा, कविता , कादंबरी या सोबतच आपणही लिहिते झालो. तर निश्चितच मराठीचा मोठेपणा सर्वदूर जाईल असा विश्वास वाटतो. म्हणून महाविद्यालयीन जीवनात भित्तिपत्रकासारखे उपक्रम अतिशय उपयोगी असतात. भाषिक कौशल्य वाढीस लागण्यासाठी भाषेची गोडी लागण्यासाठी असे उपक्रम नक्कीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर घालतील असा विश्वास वाटतो. '' असे प्रतिपादन जेष्ठ कवी माधव पवार यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज मराठी विभाग आयोजित मराठी भाषा गौरव दिन, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या स्मृतिदिनानिमित्त भित्तिपत्रकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास पुजारी, हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. संघप्रकाश दुड्डे,एम.एन.मकानदार आदी मान्यवर उपस्थित होते.


                               प्रारंभी प्रा. डॉ सुहास पुजारी यांनी या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. यामध्ये त्यांनी आजच्या मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व सांगत कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि संगमेश्वर कॉलेजचे सर्वेसर्वा कर्मयोगी अप्पासाहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून मराठीची थोरवी सांगितली. कॉलेजचे माजी विद्यार्थी ज्येष्ठ कवी माधव पवार यांचे स्वागत केले. त्यानंतर सागर सुरवसे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला .पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर शब्दवीणा या भितीपत्रकाचे प्रकाशन झाले. 

                प्रमुख पाहुणे माधव पवार यांनी दिलखुलास विद्यार्थ्यांची संवाद साधला आपल्या कॉलेजच्या आठवणी सांगितल्या.कवी कुसुमाग्रज आणि त्यांचे पिताश्री कवी रा.ना.पवार यांच्या आठवणींना उजाळा देत कविता सादर केल्या. याप्रसंगी इंग्रजी विभागातील  चिकटे, कदम,डॉ.राजकुमार मोहोरकर,प्रशांत शिंपी,संतोष पवार यांच्यासह विभागातील विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित बहुसंख्येने होते.













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के