'अवयव दान ' ही चळवळ काळाची नितांत गरज आहे. डॉ. प्रत्युष कावरा.
डॉ.व्ही.एम.मेडिकल कॉलेज यांच्याकडूनजनजागृती
सोलापूर दिनांक - '' बदलत्या काळाबरोबर जीवनमान अत्यंत वेगवान झालेले आहे, त्यामुळे अवयव दान ही काळाची नितांत गरज बनलेली आहे. ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ज्येष्ठ नागरिकांचे सहकार्य घेऊन ही चळवळ पुढे नेण्याची गरज आहे''. असे प्रतिपादन डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.प्रत्युष कावरा यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज वरिष्ठ विज्ञान विभागाने आयोजित केलेल्या अवयवदान या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. याप्रसंगी डॉ.जत्ती आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात मेडिकल कॉलेज मधील एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी अवयव दानावरती एक लघु नाटिका उत्कृष्ट अभिनयासह सादर करत अवयव दानाचे महत्व पटवून दिले.
या डॉक्टरांचा सहभाग होता
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शहानूर शेख यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. महेंद्र कावळे यांनी तर सत्कार उप- प्राचार्य डॉ.दत्तकुमार म्हमाणे यांचे हस्ते झाला .अध्यक्षीय भाषण स्वायत्त महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.शुभांगी गावंडे यांनी करत विद्यार्थ्याना साक्षी ठेवून मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प जाहीर केला.कार्यक्रम यशस्वी करणे साठी रसायन शास्त्र विभागप्रमुख डॉ.उद्धव मंडले, डॉ.कुंडलकेशा गायकवाड,डॉ. प्रतापसिंह गोरे - पाटील, भौतिशास्त्र विभागातील डॉ.सुभाष करांडे,डॉ.पुष्पा मेत्री व विज्ञान विभागातील सर्व विषयांचे विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचलन भौतिशास्त्र विभागातील कुमारी उजमा शेख यांनी केले तर उपस्थितांचे आभार मानत प्रा.शहानूर शेख यांनीस्वतः मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प जाहीर करून विद्यार्थ्याना अवयव दान करण्याचे आव्हान केले.
'अवयव दान' ही एक महत्त्वाची आणि समाजासाठी उपयुक्त चळवळ आहे. या चळवळीचा उद्देश म्हणजे शारीरिक अंग व अवयव दान करणे. अवयव दानाच्या माध्यमातून मृत्यू नंतर देखील दुसऱ्या व्यक्तीला जीवन देण्याची संधी मिळते. यामुळे अनेकांना एक नवा जीवन मिळवता येतो.अवयव दानामुळे ज्यांना किडनी, हृदय, यकृत, श्वास नलिका इत्यादी अवयवांची गरज असते, त्यांना मदत होऊ शकते. तसेच, नेत्र दानामुळे अंध व्यक्तींना देखील मदत होऊ शकते. या चळवळीचा संदेश जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना अवयव दानाची महत्त्वपूर्णता समजावून सांगणे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा