कॅंपस ते कॉर्पोरेट :अभेद कोठाडिया यांचा प्रेरणादायी प्रवास
संगणकशास्त्र विभाग आयटी क्लबतर्फे अतिथी व्याख्यान
सोलापूर, २६ जून २०२५:
संगणकशास्त्र विभागाच्या आयटी क्लबच्यावतीने 'कॅंपस ते कॉर्पोरेट : एक रोडमॅप फॉर अस्पायरिंग टेक प्रोफेशनल्स ' या विषयावर एक प्रेरणादायी व्याख्यान झाले. अभेद कोठाडिया यांनी विद्यार्थ्यांना आपला प्रेरणादायी प्रवास सांगितला. अभेद कोठाडिया हे अमेरिकन फॅमिली इन्शुरन्स,बोस्टन, यूएसए येथे लीड अँप्लिकेशन डेव्हलोपमेंट इंजिनिएअर म्हणून कार्यरत आहेत.
सोलापूर ते बॉस्टन असा प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या कोठाडिया सरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनातून व्यावसायिक तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य, मानसिकता आणि उद्योगातील अपेक्षा याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली.त्यांनी आपल्या सादरीकरणात गुणांपेक्षा दृष्टीकोन अधिक महत्त्वाचा आहे.अभ्यासक्रमाच्या बाहेर कौशल्ये विकसित करा.संवाद कौशल्ये म्हणजे यशाची खरी गुरुकिल्ली.मेन्टर्स शोधा, फक्त मॅनेजर्स नव्हे.नेटवर्किंग म्हणजे ‘कोणास ओळखता’ हेदेखील तितकेच महत्त्वाचे. कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये संधी समान आहेत.खेळांमधून संघभावना आणि नेतृत्व विकसित होते आपल्या मुळांशी जोडलेले राहा आणि धैर्याने पुढे चला.
त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. कॅम्पस ते कार्पोरेट पर्यंतचा प्रवास सांगताना अभेद कोठाडिया या यांनी संपूर्ण जीवनप्रवास अडथळ्यासहित सांगितला त्यातून विद्यार्थ्यांत एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आणि सतत कार्य मग्न राहण्याची प्रेरणा ही मिळाली. याप्रसंगीयाप्रसंगी बीबीए विभागाचे प्रा. डॉ.अर्जुन चौधरी,आयटी क्लबच्या समन्वयक प्रा.आर.व्ही. हुंडेकरी आणि सर्व विभागातील प्राध्यापक मंडळी विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक यांनी केले. सूत्रसंचालन यांनी केले तर आभार यांनी मानले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा