79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग



सोलापूर प्रतिनिधी - दिनांक १३ 

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागातील मराठी विभागाने इयत्ता अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन  केले  होते. या निबंध स्पर्धेत स्पर्धेसाठी सोशल मीडिया आणि तरुणाई, स्वातंत्र्याचा मला समजलेला अर्थ, राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका हे तीन विषय देण्यात आले होते. संगमेश्वर कॉलेजच्या भाषा संकुलाच्या वतीने ही स्पर्धा डी बिल्डिंगमध्ये संपन्न झाली. यामध्ये मराठी विभागातील  241 विद्यार्थ्यांनी  उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

        स्पर्धेच्या दिवशी प्रारंभी निबंधाचे निबंधाचे लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर विवेचन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.स्पर्धेसाठी उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक प्रा.डॉ.मल्लिनाथ साखरे, भाषा विभागाच्या समन्वयक दत्तात्रय गुडडेवाडी यांनी मार्गदर्शन केले.उपप्राचार्य,पर्यवेक्षक यांनी  स्पर्धेच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा उत्साह वाढवला.स्पर्धा यशस्वीतेसाठी मराठी विभागातील विभागप्रमुख अशोक निम्बर्गी, सायबण्णा निम्बर्गी, दत्तात्रय गुडडेवाडी, संतोष पवार यांनी परिश्रम घेतले






 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के