कर्मयोगी अप्पासाहेबांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त अमृतदानातून विद्यार्थ्यांनी संकलित केले धान्य

संगणक शास्त्र विभागाचा सामाजिक उपक्रम

सोलापूर दिनांक १७

कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संगणक शास्त्र विभाग यांच्या वतीने अमृत दान या उपक्रमांतर्गत एक मूठ धान्य समाजासाठी या हेतूने उस्फुर्त  धान्य जमा करण्याचे आवाहन शिक्षक, विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना केले होते. त्यानुसार एक मूठ धान्य समाजासाठी या हाकेला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी जवळपास ३००० जणांचे जेवण होईल इतके धान्य जमा केले. 

                           अमृतदान उपक्रमांतर्गत जमा झालेले धान्य श्री सिद्धेश्वर बोर्डिंग, विवेकानंद केंद्र संचलित अतिवृष्टीग्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या अन्नदान वाटप केंद्रास,  श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित अन्नछत्र मंडळास तसेच रॉबिनहूड आर्मी या फूड बँकेस वितरित करण्यात आले. संगणक शास्त्र विभागाच्या वतीने कर्मयोगी अप्पांसाहेबांच्या जयंतीदिनी हा उपक्रम हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना वर्गात सांगण्यात आला. ते आवाहन असे की, ''अतिवृष्टी झालेल्या भागात अनेक बांधवांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या घरचे संसार उध्वस्त झाले आहेत, शेतीचेही नुकसान झाले आहे आणि यामध्ये सर्वांत मोठी गरज भुकेल्या पोटी अन्नाची आहे.आपण सर्व समाजातील जबाबदार नागरिक म्हणून या कठीण प्रसंगी हातभार लावणे ही आपली कर्तव्यभावना आहे. मित्रांनो  धान्यदान हा सर्वात मोठा आणि तातडीचा उपाय आहे. प्रत्येक घरातून जमेल तसे मूठभर का होईना थोडेसे धान्य आले तर ते एकत्र होऊन हजारो लोकांना आधार मिळू शकतो.

                    म्हणून या आपत्तीग्रस्त बांधवांसाठी धान्य, तांदूळ, गहू, डाळी यांचे दान करावे. आपली छोटीशी मदत त्यांच्या जगण्यासाठी मोठा आधार ठरू शकेल.आपण सारे मिळून या संकटग्रस्तांना धीर देऊया, आधार देऊया आणि मानवतेचे कर्तव्य पार पाडूया.''  त्या आवाहनास प्रतिसाद देत  विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. संगणक शास्त्र विभागाच्या प्रमुख  प्रा.ज्योती काडादी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीतेसाठी संगणक शास्त्र विभागातील प्रा.राजश्री हुंडेकरी, प्रा.बमनिंग बुक्का,प्रा.रेखा पाटील,प्रा.वैष्णवी ताटे,प्रा.सोनाली पाटील,प्रा.संगीत जोगदे,प्रा.श्रद्धा काकडे,प्रा.रोहिणी अन्यापनवर,प्रा.कल्पना आडकी,प्रा.शिवानी निंबर्गी,प्रा.प्रीती शुक्ल प्रा.वंदना नारा,प्रा.धनश्री हतोळकर,  कर्मचारी राजू बागवान,संतोष फुलारी,मोहन बेलूर,असिफ शेख आदींनी परिश्रम घेतले. 

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के