शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुजनांचा गौरव

 विद्यार्थ्यांकडून  कृतज्ञता सोहळा

 


सोलापूर ( दिनांक 4 सप्टेंबर ) भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्वज्ञ, भारतरत्न, शिक्षक डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारत वर्षात  शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. शिक्षक दिनाचे औचित्य साधून संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने कृतज्ञता सोहळ्यात गुरुजनांचा गौरव  विद्यार्थ्यांनी केला. या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक डॉ.मल्लिनाथ साखरे, ज्येष्ठ शिक्षक अशोक निंबर्गी,भाषा समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी उपस्थित होते .

          प्रारंभी अध्यक्षीय निवड अनुष्का वाघमारे यांनी केली.अनुमोदन आश्लेषा गायकवाड यांनी दिले. त्यानंतर पलक आडसुळ  हिने स्वागत गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कृतज्ञता सोहळ्याचे प्रास्ताविक प्राची जोशी हिने केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाला.  सत्कारानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्यकर्तुत्वाचा आढावा घेत आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये 

यांनी मराठीतून  आपलं मनोगत व्यक्त केलं. तर   ( इंग्रजी ) यांनी  त्यांच्या आवडीच्या भाषेतून उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षकांच्या मनोगतात पर्यवेक्षक डॉ. मल्लिनाथ साखरे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य यांनी  विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याचे कौतुक केले आणि सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

                        याच कार्यक्रमात स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आले त्याचा निकाल असा -  शुभांगी येवते (प्रथम ) राजवंदिता पाटील ( द्वितीय )  आर्या वाघ ( तृतीय ) उत्तेजनार्थ -  स्नेहा बेंजर्पे, सावली क्षीरसागर, कोमल बिराजदार, रोहिणी कुसगले, अंकिता वाले, प्रज्ञा वाघमारे. सूत्रसंचालन संध्या सज्जन  यांनी केले तर भक्ती कोरचगाव  यांनी सर्वांचे आभार मानले.















































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के