शालेय,महाविद्यालयीन अभिवाचन व सुलेखन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद

 भाषा केवळ संवादाचे साधन नसून मानवी अभिव्यक्तीचे साधन आहे.

                                                                        ममता बोल्ली  



सोलापूर दिनांक २३ 

'' भाषा ही माणसाच्या विचारांना, भावना, अनुभव, कल्पना व ज्ञानाला व्यक्त करण्याचे प्रभावी साधन आहे. मनात निर्माण होणारे विचार केवळ अंतर्मनात राहिले तर त्यांचा समाजाला उपयोग होत नाही; परंतु भाषेच्या माध्यमातून ते शब्दरूपात येतात आणि संवाद शक्य होतो. बोलणे, लिहिणे, वाचन व श्रवण या सर्व क्रिया भाषेमुळेच घडतात.

भाषेमुळे व्यक्ती आपल्या आनंद-दुःखाची, प्रेम-रागाची, आशा-निराशेची अभिव्यक्ती करू शकते. साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, विज्ञान, प्रशासन—या सर्व क्षेत्रांत भाषा ही केंद्रस्थानी आहे. समाजातील परंपरा, इतिहास व संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्यही भाषा करते.म्हणूनच भाषा केवळ संवादाचे साधन नसून मानवी अभिव्यक्तीचे, विचारांच्या देवाणघेवाणीचे आणि सामाजिक एकतेचे महत्त्वपूर्ण साधन आहे.''  असे मत नाट्य कलावंत ममता बोल्ली यांनी व्यक्त केले. त्या संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या भाषा संकुलाच्या अभिवाचन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.याप्रसंगी उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक डॉ.मल्लिनाथ साखरे, समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी उपस्थित होते. 




















 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी