बिझनेस क्विझमध्ये अपूर्वा आणि संस्कृती विजेते
उद्योग विश्वात अनुभवाचे शिक्षण महत्त्वाचे ठरते.
वासुदेव बंग
सोलापूर दिनांक २२
''स्वतःला प्रश्न विचारा. असे म्हंटले जाते बारा वर्षापर्यंतच्या मुलांचा मेंदूचा विकास प्रश्न विचारण्यातून होतो. तरुणांनी उद्योजकाच्या दृष्टिकोनातून पुढे कसे जावे यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण शिकत गेले पाहिजे. अनुभव हाच सर्वात मोठा गुरु असतो. कुठल्याही उद्योगाला डिग्रीची आवश्यकता नाही, फक्त त्या दृष्टिकोनातून विचार आणि कष्ट घेण्याची तयारी असावी. चाकोरीबद्ध शिक्षणापेक्षा अनुभवाचे शिक्षण महत्त्वाचे.''असे प्रतिपादन उद्योजक वासुदेव बंग डेटा प्रा.लि.यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज कॉमर्स विभाग आयोजित बिजनेस क्विझच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.व्यासपीठावर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन समिती सदस्य शरण काडादी, प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक प्रा.डॉ.मल्लिनाथ साखरे वाणिज्य विभागप्रमुख बाबासाहेब सगर आदी मान्यवर उपस्थित होते.
बिजनेस क्विझचा निकाल - प्रथम - अपूर्वा सेठिया, संस्कृती झवेरी ( डीएचबी सोनी जुनिअर कॉलेज )द्वितीय क्रमांक- सूर्याली जाजू, विधिता चंडक ( हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स ) तृतीय क्रमांक - सृष्टी देवडीकर अनुष्का बिराजदार ( संगमेश्वर कॉलेज ) प्रथम द्वितीय तृतीय असे- श्रीजीत कलाणी - विहान झवेरी ( हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स ) योगेश्वरी यादव- प्रांजली भोसले ( छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय ) गौरी पांचाळ- दिव्या पिसके ( लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालय )
प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत झाले.तेजश्री तळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पर्यवेक्षक प्रा.डॉ.मल्लिनाथ साखरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,उद्योग विश्वासाठी उपक्रमाची उपयोगिता सांगितली. सूत्रसंचालन संगीता म्हमाणे यांनी केले तर मलिकार्जुन पाटील यांनी मानले.उपक्रम यशस्वीतेसाठी राज मळेवाडी, रवींद्र बिराजदार, निखिल काळे,रूपाली पाटील,संतोष पवार,एस.बी.निबर्गी, विक्रांत विभुते, संतोष खेंडे आदींनी परिश्रम घेतले.











टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा