संगमेश्वर महाविद्यालयाची विभागीय तलवारबाजी स्पर्धेत ५ पदकांची कमाई
सोलापूर, दि. १३ ऑक्टोबर- विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेमध्ये संगमेश्वर कनिष्ठ म हाविद्यालयाच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य अशी ५ पदकांची कमाई केली. या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा. शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन
लाभले. त्यांचे श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, सचिवा ज्योती काडादी, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा. प्रसाद कुंटे आदींनी अभिनंदन केले.
कामगिरी : सेबर: समृद्धी घाळे (सुवर्ण), श्रुतिका चव्हाण (रौप्य), श्रेयस तळभंडारे (सुवर्ण), व्यंकटेश खंडेलवाल (कांस्य). फॉईल सुमित जाधव (सुवर्ण).
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा