राज्यस्तरीय Aqua Regia Competition मध्ये ऋग्वेद देशमुख आणि सिकंदर बिराजदार विजेते



 सोलापूर प्रतिनिधी -

  Triumphant Institute of Management Education  वतीने  राज्यस्तरीय Aqua Regia Competition  घेण्यात आली होती. ही प्रश्नमंजुषा स्पर्धा नुकतीच पुण्यात पार पडली.यामध्ये  संगमेश्वर कॉलेजच्या संघातल्या ऋग्वेद देशमुख आणि  सिकंदर बिराजदार विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पुरस्काराचे स्वरूप रुपये दहा हजार आणि स्मृतिचिन्ह  असे असून त्यांची निवड मुंबई येथे होणाऱ्या विभागीय  स्पर्धेसाठी झालेली आहे.

  Triumphant Institute of Management Education  संस्थेच्या वतीने  ही शहरस्तरीय स्पर्धा प्रथम झाली. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली . राज्यस्तरीय स्पर्धा सिम्बॉयसिस कॉलेजच्या  प्रांगणातील  सभागृहात संपन्न झाली.  या  प्रश्नमंजुषा स्पर्धेत  चालू घडामोडी, भारताचा आणि जगाचा भूगोल ,खेळ, चित्रपट  यासारख्या विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. Triumphant Institute of Management Education टाइम संस्था सोलापूर शाखेचे प्रमुख प्रा.आनंद जोशी यावेळी उपस्थित होते.

 विजेत्या संघाला  कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे, मल्लिनाथ साखरे  पर्यवेक्षक, मल्लिकार्जुन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल कॉलेजच्या वतीने अभिनंदन करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा देण्यात आल्या.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा